पान:वामनपंडित १८८४.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २० ) कल्पनाचमत्कृति जेथे जेथें उत्पन्न झाली आहे तें काव्य- स्थान आणि बाकी सर्व काव्येतर ग्रंथ होय असे मानावें. दुसरे, पंडिताच्या ग्रंथांत आणखी एक्या प्रकारें तीन विभाग करितां येतात. ( १ ) स्वतंत्र कल्पनेनें रचि- लेले. ( २ ) दुसऱ्या ग्रंथांच्या आधारावर रचिलेले. (३) दुसऱ्या ग्रंथावर टीकारूप यांतून दुसऱ्या आणि ति- सऱ्या प्रकारच्या ग्रंथांची संख्या फार असून पहिल्या प्रकारचे ग्रंथ फार थोडे आढळतात. स्वतांच्या कल्पनेनें स्वतंत्र ग्रंथरचना करणें हें उ त्तम बुद्धिवैभवाचें फल होय. व अशा स्वतंत्र ग्रंथांची संख्या, भाषेंत ज्या प्रमाणानें न्यूनाधिक असते त्या प्र- माणानें त्या भाषेची प्रगल्भता व विस्तीर्णता न्यूनाधिक असते. वामनाच्या पूर्वी महाराष्ट्रभाषेत ग्रंथसंख्या व रीच वाढली आहे असे दिसतें तरी त्यायोगें तिचें प्राग- लभ्य वाढलें नाहीं व विस्तारही ह्मणण्यासारखा झाला नाहीं. स्वतांच्या कल्पनेनें स्वतंत्र ग्रंथ रचण्याचें अतिमहत्व वामनाच्या पूर्वीही लोक मानित होते. भगवद्गीतेवर के- लेली ज्ञानेश्वरी टीका ज्ञानदेवानें, आपला ज्येष्ठबंधु निर त्तिनाथ यास दाखविली, तेव्हां त्यानें मुकुंदराजाच्या स्वतंत्र ग्रंथांची स्तुति करून, टीकाग्रंथ करण्यांत काय पुरुषार्थ आहे ! असें ह्मटले. त्यावरून ज्ञानदेवानें अमृ तानुभव नांवाचा दुसरा स्वतंत्र ग्रंथ केला अशी आख्या- यिका आहे. वामनापूर्वीच्या कविवृंदांनीं ग्रंथारा महाराष्ट्रा- घेचें दारिद्र्य यथाशक्त्या दूर केलें होतें. पण तिची