पान:वामनपंडित १८८४.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भी . पं. पाचनालय, V-3007 घातल्याचे दिसते. समस्या शब्दाचा पर्याय शंका न सून, शंकेच्या अर्थी समस्या शब्दाचा प्रयोगही अभियुक्त ग्रंथांत आढळत नाहीं. "समस्यापूरण " हें काव्यकलें- तील एका प्रकाराचें नांव आहे. यावरून “समस्या पूर्ण झाली कीं नाहीं" हें काव्येतिहाससंग्रहांतील वाक्य अशुद्ध आहे असें सिद्ध होतें. वामनपंडिताच्या काव्यादि ग्रंथांचे गुणदोष व का- व्यरचनेची शैली यांविषयी विचार. - वामनपंडिताच्या उपलब्धग्रंथांची याद या निबं- धाच्या शेवटी जोडली आहे. तिजवरून ग्रंथसंख्या पु प्कळ आहे असे दिसतें; परंतु त्या मानानें त्यांत पद्य- संख्या पुष्कळ नाहीं. त्यांतूनही काव्यांत मोडण्या- सारख्या पद्यांची संख्या तर फारच कमी आढळून येते. आंता काव्यग्रंथ कोणते व ज्यांस काव्यत्व नाहीं असे ग्रंथ कोणते, याविषयीं विचार केला तर, वामनाच्या अमुक ग्रंथास काव्यत्व नाहीं असें ह्मणतां येणार नाहीं; कारण कोणताही विषय मग तो तत्वविचाराचा कां अ- सेना, त्याचे प्रतिपादन करितांना वामनानें नानाप्र- कारच्या अलंकारांनी शब्दार्थचमत्कृति केलेली बहुधा सर्व ग्रंथांत आढळते; व चमत्कृतिजनकत्व हेच कवि- तेचें कार्य आहे; तेव्हां अशी चमत्कृति ज्या ग्रंथांत मधून मधून दृष्टीस पडते त्यांस काव्यग्रंथांतून वगळतां येणार नाहीं. बरें, पंडिताच्या सर्वच ग्रंथांस काव्यत्व आहे असे मानिलें तर केवळ तत्त्वविवेचनास काव्यांत गणिल्यानें काव्यलक्षणास बाध येईल. यास्तव पंडितानें रचिलेल्या ग्रंथांत, निर्दोष शब्दार्थ व गुणालंकार यांनी