पान:वामनपंडित १८८४.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

4: ( १८ ) शंका आली तिचें समाधान झालें; इतकें झाल्यावर पुढे रामदासस्वामींच्या आज्ञेवरून तो प्राकृत काव्यरचना करूं लागला असे झटले आहे. तेव्हां काव्येतिहास- संग्रहांतील चरित्रावरून, सच्चिदानंदपदार्थाविषयींची शंका निवृत्त झाल्यावर वामनानें प्राकृतकाव्यास आरंभ केला असे दिसतें. व वामनाच्या स्वतांच्या लेखावरून तो शेवटचा प्राकृतग्रंथ रचित असतांना त्याचें सच्चि- दानंदपदार्थाविषयी शंकासमाधान झाले असे होत आहे. यांतून वामनाचा लेख बलवत्तर आहे हें कोणीही क बुल करील. • दुसरें, रामदासस्वामींच्या संबंधानें वरील चरित्रांत जें अद्भुत लिहिलें आहे, त्याचाही उल्लेख वामनाच्या ग्रंथांत आढळत नाहीं. सच्चिदानंदपदार्थाविषयींच को- णाही महापंडितास शंका येणें संभवनीय असून, वा- मनास दुसऱ्या पदर्थाविषयीं शंका आल्याचें त्याच्या ग्रंथांवरून दिसत नाही. तेव्हां वरील चरित्रांत जी एक शंका ह्मणून मोघम लिहिले आहे, ती सच्चिदानंदावि- षयींच असावी असेच मानिले पाहिजे. जर वर लिहि- लेली शंका समाधानाची गोष्ट रामदासस्वामींच्या संबं धानें घडली हें खरेंच असतें तर, जेथें वामनानें त्या गोष्टीचा विशेष विचार केला आहे, तेथें रामदासस्वा- मींचें नांव दाखविण्यास त्याजवळ गुरुभक्ति कमी होती काय ? असो. याशिवाय " समस्या पूर्ण झाली कीं नाहीं ?" ह्न- णून वरील चरित्रांत जो प्रश्न घातला आहे, त्यांतील पूर्वीपरसंबंधावरून समस्या हा शब्द शंकेच्या अर्थी