पान:वामनपंडित १८८४.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

5 MAY 2007 गति झाली असे दाखवून, आपण अवलंबिलेल्या मार्गानें लोकांनीं चालावें असौ सदुतोष त्याने केला आहे असें दिसते. निगमसारग्रंथांत वामनान अस लिहिले आहे कीं, मी ब्रह्म आणि आत्मा यांच्या ऐक्याविषयीं विचार केला; तेव्हां सत् आणि चित् पदांच्या संबंधानें आ- त्म्यास ब्रह्मता प्राप्त होते हैं मला समजलें; परंतु आ- नंदपदाचा संबंध समजला नाहीं. यास्तव मी विचारांत पडलों. इतक्यांत संन्याशाच्या रूपानें ईश्वर प्रकट झाला आणि त्यानें माझ्या मनांतील सर्व शंका केल्या व सर्व उपनिषदांचें सार समजावून दिलें. "सांख्य योग वेदांत || तिन्ही शास्त्रांचा सिद्धांत ॥ श्रुतिमुखें दोहों मुहूर्तांत || उपदेशिला || सांख्यें “आत्मत्व निर्धार ॥ योगें वृत्तिशून्यसाक्षात्कार || सा- कार तितुकें निराकार || वेदांत गुत्द्य || 'योगावांचुनी । शुष्क वेदांतें करूनी । तवसिद्धि नव्हे 'ह्मणूनी ॥ सांगितलें रहस्य. 66 सांख्य- " 66 66 निगमसारग्रंथ समाप्त झाल्यावर वामनपंडित फार दिवस जगला नाहीं. तो, कृष्णातीरीं वांई क्षेत्राजवळ पांडववाडी ह्मणून गांव आहे, तेथें शके १५९५ वैशाख शुद्ध ६ या दिवशीं वारला. त्याच्या शिष्यांनीं त्याच्या पादुका अद्यापि संभाळून ठेविल्या आहेत व त्यांची ते पूजा करीत असतात असे ऐकण्यांत आहे. काव्येतिहाससंग्रह नांवाच्या मासिक पुस्तकांत वाम- १ जुन्या नवनोतांतील निबंध. 116 MAR 1990