पान:वामनपंडित १८८४.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १४ ) याविषयींच्या प्रमाणास पंडितांचे ग्रंथचे ग्रंथ भरले अ सून मोरोपंतानेंही झटलें आहे कीं:- - " सगुण श्रीहरिभक्त ख्यात ज्ञात्याजनांत हा शुकसा" श्रीपतिभक्तोत्तम जो गावा तद्रूप दामनस्वामी " वामनपंडितस्तुति. “ नमिला साष्टांग श्रीपतिभक्तिरसज्ञ वामन स्वामी सन्मणिमाला. " पंडितानें केलेल्या ग्रंथांत जागोजागी ते ग्रंथ ईश्वरानें रचिले आहेत असा उल्लेख आढळतो; व भागवतधर्म आचरण करणाऱ्या मनुष्यास जी गति होते ती आप- णास प्राप्त झाली आहे असेंही तो मानित होता असें दिसतें. " ऐसा नामसुधा ह्मणोनि रचिला श्रीवल्लभें ग्रंथ हा || सर्वात्मा हरि वामनाननमिसें जें बोलिला तें पहा ॥ जे हा वर्णिति आयकोनि धरिती भावार्थ त्या " सज्जना ॥ होती भागवती गती कलियुगी नामें ज- “ शी वामना ॥ " 66 66 ८८ नामसुधा. आतां "वामना" हैं गतीचें विशेषण होऊन ग्रंथका- राच्या नांवाचें चतुर्थीचें रूपही होतें; यावरून भागवती - गति आपणास झाली असें वामन मानित होता, हा अर्थ वैकल्पिक वाटतो; तथापि आपलें नांव ग्रंथाच्या शेवटीं प्रदर्शित करण्याची वामनाची चाल आहे तिला अनुसरून ‘‘वामना” हें पद ग्रंथकर्त्यानें आपलें नांव दाख- ग्याकरितांच घातलें आहे असें ह्मणण्यास हरकत दिसत नाहीं. आणि आपण मुक्त झालों अशी अन्यत्रही वा- मनाची उक्ति आढळते. यावरून आपणास भागवती-