पान:वामनपंडित १८८४.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १३ ) श्रुतीसही मान्य आहे. यास्तव केवळ ईश्वरगुण वर्णन करण्याचाच वामनानें दृढ निश्चय केला होता व त्याच्या वैराग्यशील, प्रगल्भ आणि विस्तृत अंतःकरणास तो भूषणभूत व आनंदजनक झाला असें दिसतें. वामनाचें चित्त निरंतर ब्रह्मविचारांत निमग्न असे. त्यानें श्रीकृष्णलीला मोठ्या प्रेमानें वर्णन केली आहे तरी तींत मधून मधून त्याचा ब्रह्मविचार प्रस्फुरत अस लेला दिसतो. इहलोकसंबंधी विषय क्षणभंगुर व तुच्छ, सर्व विश्व ईश्वरमय व ईश्वर विश्वमय आहे, आपला आत्माच ईश्वर आहे; ईश्वरास जलाची उपमा योजिल्यास विश्व हें तरंगाप्रमाणें समजावें. असे विचार वामनाच्या मनांत नेहमी घोळत होते, असें त्याच्या ग्रंथांवरून दिसतें. वामनानें प्रियसुधानामक लहानसा उपदेशग्रंथ आ पल्या पत्नीसाठी रचिला असें त्यांतील शेवटच्या पद्या- वरून दिसतें. प्रियसुधा उपदेश गिराप्रती । करुनि वामन तीस ह्मणे सती ॥ परम आवाडे आपुलि आपणा । वळख तूं तुज टाकुनि मीपणा ॥ १८ ॥ प्रियसुधा. जगदुत्पत्तिस्थितिलयहेतु असा एक निर्गुण निराकार । ज्ञानानंदमय ईश्वर आहे असें पंडितानें सर्वत्र मानिलें आहे; तरी सगुण अवतारांस ईश्वर मानून त्याच्या भ क्तिरसांत आनंदानें मन झालेलाही तो सर्वत्र आढळतो.