पान:वामनपंडित १८८४.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२ ) काव्यांत ज्या कुनर आणि अपूत नारी । वर्जूनि वर्णिति जयांत न पूतनारी ॥ तें काकतीर्थचि कदापि न मानसाच्या । हंसाचिया रमति हो गति मानसाच्या ॥ २५ ॥ उष्टीं धुतां अन्न न काय सांचे । गर्ताजळी त्या मग वायसांचे ॥ समूह धाती न कदापि जाती । त्या काकतीर्थाप्रति हंसजाती ॥ ३७ ।। उच्छिष्ट ताटांतिल अन्न सांचे । धूतां जळीं त्या मग वायसांचे ॥ समूह तें घेउनि तृप्त जाती । न पाहति ते शुकहंसजाती || धनाकारणें जे पराधीनवाणी । कवी नाचवीती वृथा दीनवाणी || अहो त्यांत अन्योन्य उच्छिष्ट सारें । कवित्वें जना वाटतीं तींच सारें ॥ ३९ ॥ वामन, द्वारकाविजय सर्ग २. कितीएक तच्ववेत्ते पंडित काव्याला तुच्छ मानितात; " रंडागीतानि काव्यानि" असे त्यांचे नेहमीं उद्गार निघत असतात. दुसरें, “काव्याला पांच वर्जयेत्” अशी एक स्मृतिही आहे. तेव्हां वामनपंडितानें मनुष्यपर काव्य करणाऱ्यांस जेंदूपण दिले आहे तें निराधार नाहीं. ईश्वरगुण वर्णन करणे हा काव्यालाप नाही ही गोष्ट