पान:वामनपंडित १८८४.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १९ ) नुभवानें लीन झाल्यामुळे समदर्शन, शांति, तितिक्षा इत्यादि अमूल्यगुणांचा त्यास स्वाभाविक लाभ झाला होता. ब्राह्मणांनीच वेदार्थ सांगावा, इतर जातीस तो अधिकार नाहीं; तसेंच वंशपरंपरेनें ब्राह्मणांस झालेली संतति ब्राह्मणच, मग तिचे गुण चांडालासारखे असले तरी ब्राह्मणत्वास न्यूनत्व येत नाहीं; व एकाद्या शू- द्रांत जरी ब्राह्मणाचे निर्मलगुण वसत असले तरी त्याचें शूद्रत्व दूर होत नाहीं. ही समजूत सांप्रतही प्रवल आहे. तेव्हां वामनाच्या वेळी ती किती प्रबल असेल याच स- हज अनुमान करितां येतें. अशा स्थितीत वामनानें अशा प्रवलमतास दूर झोंकून दिलें !! व पंडितांची व इतर स्वजातीयांची भीति न धरितां त्यानें आपलें स- त्यमत प्रकट केलें हें त्याचें कांहीं सामान्य धैर्य नव्हे. ईश्वर गुणवर्णनाशिवाय लोकवार्तेचें काव्य करणें नि- रर्थक आहे अशी वामनाची समजूत होती. ईश्वरानें हरिकथेचा छंद आपल्या मनास लावून दिला हैं आपलें मोठें भाग्य आहे असें तो मानित होता. ज्या काव्यांत मनुष्याच्या उद्देशाने शृंगारादिरसात्मक वर्णन असतें त्या काव्याचें व तें रचणाऱ्याचेंही विडंबन पंडितानें केले आहे. करी धन्य गोपाळजी वामनातें । कथाछंद लावूनि त्याच्या मनाते ॥ महाभाग्य हें अन्यथा काव्यरीति । वृथा ज्या कवी लोकवार्ता करीती ॥ ४४ ॥ वेणुसुधा. KASHINATH G. MARATH BAOR