पान:वामनपंडित १८८४.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १० ) जयाची वदे पूर्ण वेदार्थ वाणी । ह्मणावें कसेंहो तयालागि वाणी || परब्रह्मरूपी असा हा तुका वा । तयाचे तुकीं कोण दूजा तुकावा ॥ २ ॥ मयूराचे आंगीं विपुल नयनाब्जें विलसती । परी एके दृष्टीविण समुळ तीं व्यर्थ दिसती || तशी नानाविद्या जपतपव्रतें वैभवकळा | कळा त्या जाणाव्या हरिगुरुकृपेवीण विकळा ॥ ३ ॥ आत्मा जगज्जीवन वामनाचा । जो सोहळा नित्य नवा मनाचा ॥ नामामृतें ग्रंथ कलौ करीतो । नामें जना तारक लौकरी तो ॥ यांतील पहिल्या दोन पद्यांत हरिकीर्तनहमत्त्व व तुकाराममहत्त्व वर्णिले असून तिसऱ्या पद्यांत, हरिक- पेचें महत्त्व दाखवून, केवळ विद्याकला मात्र जाणतो, प रंतु अभक्त आहे अशा विडंचन व हरिभक्त अतएव हरिकृपापात्र अशा तुकारामाचें मंडन इंगित केलें आहे. या गोष्टीवरून वामनपंडिताची भगवन्निष्ठा, समदृष्टि, साधुत्व, निरहंकृति इत्यादि सगुण जागृत होते असे दि- सतें. वस्तुतः पंडित म्हटला म्हणजे संस्कृताचा व वेदांचा मोठा अभिमानी, प्राकृतभाषेस व प्राकृतलोकांस आणि विशेषेकरून शूद्रादिकांस तर अगदी कसपटाप्रमाणें तुच्छ मानणारा, व गर्वमदाची केवळ मूर्तिच असा अ- सतो; परंतु वामनपंडित हा तसा नव्हता. तो आत्मा-