पान:वामनपंडित १८८४.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चौतरा जी से. पं. पाचनालय, वामनपंडितास उपरति झालीच होती, त्यानंतर प रमवैराग्यशील रामदासस्वामी यांचा त्यास समागम झाला. तेव्हांपासून महाराष्ट्रभाषेंत लोकोपयोगी काव्य करण्यास त्यानें आरंभ केला. त्याच्या कवितेंत यमकांचा भरणा अतिशय असल्यामुळे रामदासस्वामींनी त्याचें नांव यमक्यावामन " ठेविलें होतें असें ह्मणतात. वामनपंडिताविषयीं संतविजयग्रंथांत खाली लिहि ल्याप्रमाणें गोष्ट लिहिली आहे:- 66 -- महान् विख्यात प्रतापादित्य छत्रपति शिवाजीमहा- राज ह्यांजला राज्याभिषेक करणारे वेदशास्त्रसंपन्न गागा- भट्ट आणि वामनपंडित असे उभयतां एके समयीं तुका- रामबावाच्या कीर्तनास गेले होते. त्या समयीं रामदास- स्वामीही तेथेंच होते. तुकारामाच्या निस्टह व सरस व- क्तृत्वानें हरिकीर्तनास मोठा रंग आला असून तुका- रामाच्या मुखांतून श्रुत्यर्थाचाही अनुवाद तेथें होत होता. तुकाराम हा जातीचा वाणी असून श्रुत्यर्थ बोलतो व आपण ब्राह्मणांनीं तें व्याख्यान श्रवण करावें हें अगदी. उचित नाहीं, असें गागाभट्टास वाटून त्यानें ती गोष्ट त्या हरिकीर्तनप्रसंगी प्रदर्शित केली; तेव्हां त्यावि- षयीं त्याच प्रसंगी वामनपंडितानें श्रुतिप्रमाणासह समा- धान केलें तें:- वेदींही हरिकीर्तनींच महिमा केला असे आदरें । कोठेंसा तरि विष्णुसूक्त अवधें शोधोनि पाहा बरें || त्या मध्येच तृतीय वर्गहि ‘भवान्मित्रो' असे त्या पहा | त्यामध्यें तिसरी ऋचा तव 'तमुस्तोतार' नामें पहा ॥ १ ॥