पान:वामनपंडित १८८४.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(<) ब्रह्मराक्षस दुसऱ्यास ह्मणूं लागला की, मला अश्वत्थाच्या या खांदीवर बसावयास जागा दे, तेव्हां दुसरा ह्मणाला, या खांदीवर बसण्याची तुझी योग्यता नाहीं व माझीही नाहीं, कांतर एथें वामन ह्मणून मोठा पंडित आहे त्यानें वादविवादांत पुष्कळ पंडितांस जिंकिलें आहे, तो मरण पावला ह्मणजे मोठा ब्रह्मराक्षस होईल; त्याच्या योग्यते- प्रमाणे त्याला बसण्याकरितां जागा पाहिजे ह्मणून ही ठेविली आहे. असे शब्द ऐकतांच वामनास अनुताप हो- उन उपरति झाली. तेव्हां त्यानें विचार केला की, इतकी मेहनत करून इतकें शास्त्राध्ययन केलें, वादविवादांत अजिंक्य झालों, त्याचें फल केवळ गवनें व भूतद्रोहानें इतकें दुष्ट होणार आहे; त्यापक्षी इतःपर वादविवाद करण्याचें सोडून भगवत्पदीं लीन व्हावें, व ईश्वर गुण वर्णन करण्यांत कालक्षेप करावा हेंच उत्तम आहे असा त्यानें दृढ निश्चय केला. S ही दंतकथा खरी आहे किंवा खोटी आहे ह्याचा विचार करण्याचें येथें कांहीं कारण नाहीं, तथापि या चालत आलेल्या कथेपासून आमच्या महापंडितावि- षयीं लोकांचा काय अभिप्राय होता हे चांगलें काढतां येतें. वादविवाद करून दुसऱ्यास जिंकणारे महापंडित नेहमीं क्रोध आणि गर्व ह्यांचें अधिष्ठान असतात, तमोगुणाच्या आश्रयानें राहणारे लोक अधोगतीस तात हे शास्त्रप्रसिद्धच आहे. अर्थात् वामनपंडितास ब्र ह्मराक्षसयोनि प्राप्त होण्याचा संभव त्या वेळी लोकांनी मानिला होता असे वाटतें. दुसरें वामनपंडित हा संस्कृत- भाषेंत व शास्त्रांत अप्रतिम विद्वान् होता हेंही दिसते. व जा-