पान:वामनपंडित १८८४.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२३ ) उळत नाहींत. चित्सुधा, प्रियसुधा, तत्त्वमाला, कर्मतव, चरमगुरुमंजरी, गीतार्णव इत्यादि अनेक स्वतंत्र प्रकरणे वामनानेही रचिलीं आहेत; परंतु त्या सर्वांत आत्मज्ञा- नाचा एकच विषय असल्यामुळे ठरीव आणि तत्त्वसिद्ध- तेच्या कल्पनांचीच आवृत्ति झाली आहे. तेव्हां चम- त्कारिक कल्पना प्रसवण्याचें कारणच वामनास उत्पन्न झालें नाहीं. मोरोपंताच्या वर लिहिलेल्या ग्रंथांत ज्या कल्पना दिसतात त्या मोठ्या मनोवेधक आणि चित्तास चमत्कृतिजन्य आनंद देणाऱ्या आहेत यांत कांहीं सं- शय नाहीं. वामनाच्या काव्यांतही कोठें कोठें चमत्कारिक क रूपनांचा मासला आढळतो. परंतु तो पंतासारखा उज्वल दिसत नाहीं. वामनाची अद्वैतशास्त्रावर स्वाभाविक प्रीति असून त्या शास्त्राचा काव्यकल्पनांशी फारसा मेळ नसल्यामुळे, जरी वामनांत चमत्कारिक कल्पना प्रसव- ण्याची शक्ति होती तरी तिचा त्यानें काव्यांत हेतुपुर:- सर उपयोग केला नाहीं असें वाटतें. वामनपंडिताप्रमाणें भक्तीनें ईश्वरपदलीन होऊन अ द्वैतविचारावर मोठमोठाले ग्रंथ लिहिणारा, अक्षरग- णांच्या वृत्तांनीं सोपी, मधुर व पुष्कळ कविता रचणा आणि निस्टहतेनें केवळ ईश्वरपर वर्णन करणारा ग्रंथ- कार, कवि आणि साधु, त्याच्या मार्गे आजपर्यंत झाला नाहीं. वामनपंडितानें महाराष्ट्रभाषेवर व लोकांवर फार उपकार केले आहेत. देशांत अशा प्रकारचे लोक उ त्पन्न करून त्यांच्या हस्ते परमेश्वर, लोकांचें ऊर्जित करत असतो, वामनपंडिताप्रमाणे विद्वान्, उद्योगी,