पान:वामनपंडित १८८४.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२२ ) भरेल असे वाटत नाहीं. उभयतांनी रचिलेल्या ग्रंथांतील पद्यसंख्येचें मान सरासरी सारखेंच आहे, तरी अतिक- ठिण अध्यात्मविचारावर पंडितानें फार मोठी व सुगम बाळबोध ग्रंथरचना केली, तशी त्या विषयावर पंतांची नसून पंडिताचें काव्य जरी पंताच्या काव्याच्या मानानें थोडें दिसत आहे तरी तें पंताच्या काव्यापेक्षां सुगम व गोड असल्यामुळे अधिक लोकप्रिय आहे. वामनाच्या काव्याची मधुरता व प्रसादवाणी इतकी मोहक आहे कीं, तिच्या योगानें महाकवि मोरोपंतही मोहित झाला. त्यानें वामनाच्या मधुर मोहक वाणीचें वर्णन थोडक्यांत उत्कृष्ट केले आहे. वाटे सूक्ति-श्रवणें मस्तक वाल्मीकिनेंहि डोलविला । प्रभुनें सुलवाया मन वामन हा वेणुसाचि बोलविला || यांत पंतानें वामनाच्या वाणीची महती लोकोत्तर व र्णन केली आहे. व त्याच्या काव्यांतील कांहीं कांहीं स्थलेंही तशींच मनोहर आहेत, यांत संशय नाहीं. त सेंच ज्या आर्येकडून पंतानें पंडिताचें मोठें गौरव केलें तीच आर्या पंताचेंही चतुर कवि म्हणून मोठेंच गौरव करीत आहे, हे काव्यज्ञास सांगावयासच नको. चमत्कारिक कल्पना प्रसवण्याची शक्ति हें कवितेचें जीवन आहे. त्या संबंधानें पंत आणि पंडित ह्यांची तु- लना केली असतां असें दिसतें कीं, केकावलि, सन्मणि- माला, संशयरत्नमाला, आर्याकेका व अनेक साधूंचे व देवतांचे स्तव इत्यादि प्रकरणें पंतानें स्वतांच्या कल्प. नेनें जशी रचिलीं आहेत, तशीं वामनानें रचिलेली