पान:वामनपंडित १८८४.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

r ( १२१ ) ठिकीवर त्याची सूक्ष्म दृष्टि फिरली असावी. केवढाही विद्वान् असो, कसाही कुशल असो, मोठा कवि असो, वर्णनीय विषयाशीं तो मनानें ऐक्य पावून मिळून जाणार नाहीं तर त्याचा ग्रंथ रसभरित होणार नाहीं. तसा प्रकार वरील वर्णनाच्या संबंधानें पंताच्या कवितेचा झाला आहे. आतां इतकें मात्र खरें आहे कीं, पंताच्या कवितेची झोकदार भाषा, मोठमोठालीं समासपदें, प्रौढी, वर्णनाची सुसंगति व एकसारखा प्रवाह, मनास आनंदानें पुष्ट क रणारे शब्दालंकार व अर्थालंकार, थोड्या शब्दांत पु- एकळ अर्थ, सुशोभित इमारतीस कारागिरीनें जोडलेल्या सुंदर चिऱ्याप्रमाणें केलेली शब्दरचना इत्यादि पंताच्या कवितेचे सर्व साधारण गुण ह्याही प्रकरणांत तसेच चां- गले उतरले आहेत. तथापि वर दाखविलेल्या कितीएक कारणांवरून व संस्कृत शब्दांचें मिश्रण फार झाल्या- मुळे रुचिभिन्नत्वसंबंधानें पंताचें हें काव्य जितकें लोक- मान्य होईल, त्यापेक्षां सुगम व मधुर ह्मणून वामनाचें वर्णन अधिक लोकप्रिय होईल यांत संशय नाहीं. या कवितासंबंधानें उभय कवींच्या ग्रंथांचे उतारे एथें दिले असतां ग्रंथविस्तार फार होईल यास्तव ते दिले नाहींत. वामनपंडित आणि मोरोपंत ह्यांची तुलना करि- तांना आमच्या दृष्टीनें जे गुणदोष दिसले, ते आह्मी वर दाखविले आहेत. त्यांवरून एकंदरीत वामनापेक्षां मोरोपंताच्या गुणाची अधिकता दिसते, परंतु सूक्ष्म वि चार केला तर काव्यरचनेच्या व ग्रंथरचनेच्याही सं बंधानें एकंदरीत वामनाची योग्यता मोरोपंतांपेक्षा कमी ११ KA, GARARS ओर s ww B