पान:वामनपंडित १८८४.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२० ) चना या योगानें नेहमीप्रमाणें वामनाचें हें प्रकरणही माधुर्य आणि प्रसाद यांचें सदन झाले आहे. प्रास, य- मर्के, स्वभावोक्ति इत्यादि अलंकारही यांत चांगले सांधले असून ग्रंथसंगतिही मनोहर आहे. हें वामनाचें वर्णन मोरोपंताच्या वर्णनाशीं लावून पा- हिलें तर, मोरोपंतानें एका श्लोकांत जी गोष्ट सांगितली आहे, तिचें वर्णन वामनानें एका संगीत छप्पन श्लोक करून केले आहे. तेव्हां विस्तारानें वर्णन करण्याचा जो गुण वामनांत आहे तो मोरोपंतापेक्षां स्तुत्यर्ह आहे. दु सरें माधुर्य, प्रसाद हे गुण वामनांत मोरोपंतापेक्षां स्पष्ट अधिक असून, वामनाचें अंतःकरण जसें कवितेशीं सु- लीनतेनें व भक्तीनें तादात्म्यभाव पावलेले दिसतें; तसे मोरोपंताच्या कवितेवरून त्याचें अंतःकरण त्याच्या कवितेशीं एकीभाव पावलेले दिसत नाहीं. वामनाच्या ह्या कवितेवरून त्याची भक्ति सोज्वळ व जागृत दिसते, तो खुबी पंतांच्या वर्णनांत नाहीं असें आह्मास वाटतें. क्वचित् च्युतसंस्कृति, असंगति हे दोष वामनाच्या व र्णनांत आहेत, त्या मानानें ते पंताच्या वर्णनांत नाहींत. तथापि ह्याच गोष्टीवरून कवीचा कवितेशीं झालेला ता- दात्म्यभाव चांगला व्यक्त होतो. प्रेमपुरःसर वर्णन क रण्याच्या भरांत व झोंकांत वामनानें क्वचित् स्थलीं व्या- करणाकडे किंवा संगतीकडे लक्ष्य दिलें नाहीं, यामुळें दोष गुणरूप त्याच्या या काव्यास शोभा देतं आहे. पंताच्या रचनेवरून त्यानें केवळ कीर्ति संपादनार्थ काव्य करण्यांत कुशलता खर्च केली आहे. यामुळे ठाक