पान:वामनपंडित १८८४.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११९ ) शिवाय एका कवीचे अनेक ग्रंथ असल्यास ते सर्वच कसारखे उतरतात असाही नियम नाहीं. तथापि वाम- नास वाईटपणा आणण्यास वरील दोन प्रकरणे जितकीं कारण आहेत, तितकीं त्याची दुसरी प्रकरणे दिसत नाहीत, यामुळे अन्य प्रकरणांच्या संबंधानें थोडासा वि. चार करूं. भगवान् श्रीकृष्णानें भौमासुराचा वध करून सोळा सहस्र स्त्रिया द्वारकेस आणून वरिल्या. हा चमत्कार पहाण्याकरितां नारदमुनि द्वारकेस आले व त्यांनीं श्री- कृष्णाची अगाधमाया अवलोकन केली. हा कथाभाग वामनपंडितानें द्वारकाविजयनामक प्रकरणांत वर्णन केला असून, तीच कथा मोरोपंतानें बृहद्दशमाच्या ६९ व्या अध्यायांत वर्णिली आहे. हीं उभय कवींचींही वर्णनें श्लोकवृत्तांत आहेत. ह्या वर्णनाच्या संबंधानें पंडित आणि पंत ह्यांची तुलना केली असतां पंडितांची कविता पंतांच्या कवितेपेक्षां स- रस आहे असे दिसतें. आपला उपास्य देव भगवान् श्रीकृष्ण यानें एक सम- यावच्छेदेंकरून सहस्त्रावधि रूपें धारण करून सोळा सहस्त्रस्त्रियांबरोबर विवाह केला, इत्यादि अद्भुत लीला मनांत आणून वामनानें त्या मोठ्या प्रेमोल्हासानें गाइल्या आहेत. वर्णनीय विषयाशीं ग्रंथकर्त्याचें तादात्म्य झालें असतां, वर्णनाचा पाक उत्तम उतरतो, व तो वाचकांस- ही आनंदजनक होतो. त्याप्रमाणें वामनाच्या द्वारका- विजयांतील कवितांचा रसपरिपाक चांगला उतरला आहे. सोपे शब्द, सरल अर्थ, लहान लहान, 11 JAN 1994 मधुर वर्णर