पान:वामनपंडित १८८४.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११८ ) णांच्या संबंधानें वामनपंडित आणि मोरोपंत ह्यांची तु- लना केली; येवढ्यावरून ग्रंथरचनाकौशल्य आणि कवित्वरचना ह्यांत वामनापेक्षां मोरोपंताची योग्यता अ धिक दिसून आली. ग्रंथकार आणि कवि ह्यांची तुलना करितांना त्यांचे संपूर्ण ग्रंथ एकमेकांशी लावून पाहून त्या- वरून एकंदरीत त्यांची योग्यता काय आहे हे ठरवि- ण्याची खटपट करून जें ठरतें तेंच स्थालीपुलाकन्यायें त्यांचे एकदोन ग्रंथच तपासून व ताडून पाहिले असतां समजण्याचा संभव आहे. त्याप्रमाणें वरील दोन ग्रं- थांच्या संबंधानें उभय कवींविषयीं, ग्रंथरचना व कवि- त्वशक्ति या संबंधानें अनुमान झालेंच. तथापि वामनपं-, डिताचीं जीं उत्तम कविताप्रकरणें आहेत, त्यांतील ए- काद्याशी मोरोपंताच्या त्याच प्रकरणाची तुलना करून पाहिल्यावांचून उभय कवींच्या योग्यतेविषयीं निश्चय ठरवितां येत नाहीं. कारण, महाकवीच्या ग्रंथभांडारांत कधीं कधीं ना- मसादृश्यामुळे अल्प कवींचे ग्रंथही कालगतीनें प्रविष्ट होऊन ते महाकवीच्याच नांवावर मोडूं लागतात. तसा प्रकार सुदामचरित्र आणि विराटपर्व यांत वाम- नाच्या संबंधानें कदाचित् झाला असेल तर, त्यांतील अ- नेक दोपांचा आरोप वामनावर विनाकारण येऊन त्याची योग्यता कमी दिसण्याचा संभव आहे. वरील दोन प्र करणें वामनपंडिताचीं नाहींत, तीं दुसऱ्या कोणी वाम- नानें रचिलीं असावी, असे त्यांतील रचनेवरून कोठें कोठें भासतें; परंतु तसें निश्चयानें ह्मणण्या इतका फरक दि- सत नसून, तसें ह्मणण्यास अन्य प्रमाणही नाहीं. या-