पान:वामनपंडित १८८४.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ७ ) त्याचें ग्रंथभांडार निर्मल, दिव्य व पुष्कळ कवितार- लांनी भरलेलें आपणापुढे आहे. त्या भांडाराचा या देशांतील साधारण वक्त्यांच्या व रसिकजनांच्या वाणीस अलंकृत करण्यांत पुष्कळ उपयोग होत आला आहे; या कारणानें त्या कविरत्नाकराविषयीं रसिकजनांकडून कांहीं तरी माहिती मिळेल असे वाटतें; परंतु शोधाअंतीं तोही तर्क निष्फल होऊन जातो. यास्तव वामनाच्या " ग्रंथांतील उल्लेखावरून व दंतकथांवरून जेवढे त्याचें वृत्त समजतें तेवढेंच येथें दर्शित करण्याखेरीज दुसरा इलाज नाहीं. वामन हा सातारा जिल्ह्यांतील कोरेगांव कुमटें एथला जोशी होता. हा जातीचा ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण. ह्याच्या बापाचें नांव नृहरिपंडित, आईचें नांव लक्ष्मी- बाई आणि बायकोचें नांव गिरीबाई. ह्याचें गोत्र शां- डिल्य व कुलदैवत नृसिंह होतें. वामनपंडिताविषयीं दंतकथा अशी आहे कीं, त्यानें संस्कृतभाषेचा अभ्यास करून काशीस शास्त्रा- ध्ययन पुष्कळ केलें व वादविवाद करून पुष्कळ पंडि- तांस जिंकिलें. हा महापंडित वादविवादांत अजिंक्य होता. एके दिवशी सायंकाळी अश्वत्थाच्या पारावर एकटाच निश्चल बसला असतां त्यानें अश्वत्थावरील ब्र ह्मराक्षसांचा चमत्कारिक संवाद श्रवण केला तो:- पहिला १ ताताभिधा नृहरिपंडित मायलक्ष्मी | दे सर्वदा सुगुणयुक्त उ दारलक्ष्मी || शांडिल्यगोत्र कुळदेव नृसिंह ज्याचा | दासानुदास निज- वामन हो निजाचा ॥ २१ ॥ वामन, भीष्मयुद्ध.