पान:वामनपंडित १८८४.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११४ ) नाहींत. त्याप्रमाणे आमच्या पंडितांची वाणी मूळची •. साधी असून, इतिहास लिहिण्याच्या प्रसंगी ती अस्ता- व्यस्त होऊन गेली आहे. कोणत्या ठिकाणीं किती व कसें बोलावें, कोणतें वर्णन विस्तृत केले असतां गोड हो- ईल, कोणतें कंटाळवाणें होईल ! कोणाचा स्वभाव कसा दाखविला पाहिजे. ग्रंथांचें संग्रथन कसें केलें असतां तो लोकप्रिय होईल, इत्यादि गोष्टींचा विचार वामनानें केला नाहीं. किंवा त्याच्या बुद्धीच्या आटोक्यांत तो आला नाहीं. यामुळे त्याची कविता मनोहर झाली नाहीं. याशिवाय व्याकरणशुद्धि, वाक्यपूर्णता, अलं- कारशुद्धि, छंदःशुद्धि इत्यादि गोष्टींकडेही त्यानें लक्ष्य दिलें नाहीं. तथापि जसा मोरोपंतांत संक्षेपानें अर्थ कथन कर ण्याचा गुण आढळतो, तसा उक्तार्थाचें विस्तारानें प्रपं- चन करण्याचा गुण कोठें कोठें वामनांतही दिसतो. वा- मनांच्या विराटपर्वीतील कांहीं मासला एथें देतों. तूं राजपुत्र असतां नगरीं, परांनीं । नेले तुझे सकळ गोकुळ गोप रानीं ॥ होते तया रिपु विलंब न लाव राया । शत्रूयशास समयो बनला वराया ॥ ८९ ॥ हैं वृत्त ऐकुनि नृपात्मज वापराणी । गेहांसि जाउनि वदे बहु गोप राणीं ॥ " १ बाप- राणी - गेह झणजे आईचें घर ही शब्दयोजना किती अ शुद्ध व नीरस आहे !! याप्रमाणेंच द्वारकाविजयांतही " वर-बाप ही प्र तिगृहीं वसुदेव."