पान:वामनपंडित १८८४.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

". ( ११२ ) लेवविलें राजसुतें जाणों ल्याला कधीं न तो कवच । सच्चरित अप्रगल्भ हि हृदयहर जसें स्वधीन-तोकवच ॥३०॥ होउनि सिद्ध रथावरि चढतांचि सहोत्तरा तिच्या आली । ह्मणती बृहन्नडे तुज वीरश्री गौरवावया आली ॥ ३१ ॥ दिव्य - रुचिर - वस्त्रातें आण करायासि बाहुलें कटकें । जिंकुनि अरिचीं तूंही बहु शोभाया स्ववाहु ले कटकें ॥ ३२ ॥ कुरुकटकासि पहातां तो उत्तर वाळ फार गडबडला | स्वपर-बळावळ नेणुनि बालिश बहु बायकांत बडबडला ३९ बोले बृहन्नडे हें कुरुबल कल्पांतसिंधुसमै गमतें | ने रथ पुराँत माझें मननयनहि पाहतां बहु भ्रमतें ॥ ४० ॥ दुर्योधन दुःशासन कर्ण कृप द्रोण भीष्म ज्या कटकीं । त्यांत मरेनचि शिरतां कांव्यावरि घालितां चिरे पट कीं४ १ एकाकी मी रिपु बहु या ऐशा कीर्ति काय हो मरणीं । पश्व केंवि करूं सर्व पुमर्थद-सुकाय-होम रणीं ॥ ४२ ॥ आज्ञा नसतां आलों रागें न भरेल काय हो तात । रोमांच धर्म कंप प्रकट व्यापूनि काय होतात ॥ १३ ॥ पार्थ ह्मणे राजसुता आतां वदतोसि हें अहा काय । शय्येवरि न पडाया योग्य रणक्षिति वरीच हा काय ॥ ४ ४ ॥ तेव्हां स्त्रियांत तैसें बोलुनि आतां असें कसें वदसी । एकहि बाण न सुटला नाहीं अद्यापि झळकला सदसी ४५ गोमुक्त्यर्थ न शिरतां धैर्ये या वीरनायकानीकीं । करिजेल हास्य आस्य प्रेक्षुनि नगरांत बायकांनीं कीं ॥ ४६॥ १ सर्व संग्रहांत " सिंधुसें " असा पाठ आहे. ✔