पान:वामनपंडित १८८४.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १११ ) मिळवा कोणी तरि हो धैर्याचा मात्र उदधि सारथि जो । कुरुभट समूह पाहुनि मज जेविं हिमासि सुदधि-सार थिजो ॥१०॥ ऐसें बहुतचि बोले तो बालिश बोल बायकांमाजी । चित्रपट कटकसें शिशु-भाषण येईल काय कामा जी ॥११॥ उत्तर ह्मणे कुरुकटक न पशूंस यशास हि स्वसे नेतें । अवकाश पळाहे नाहीं कळवाया वृत्त हें स्वसेनेतें ॥ १८ ॥ उत्तरेचें बृहन्नडेशीं भाषणः -- गोधन षष्टिसहस्र स्वपुरा नेताति हरुनि कौरव हो । गौरव हो न बुधजनीं त्या मेल्याला अनंत रौरव हो ॥२०॥ देता झाला पूर्वी तुज निजसारथ्य सव्यसाची हो । सैरंध्रीची वाणी व्हाया गोवत्सभव्य साची हो ॥ २२ ॥ हें ऐकून बृहन्नडेची जी स्थिति झाली ती पंतांनी किती थोडक्यांत उत्तम वर्णिली आहे पहा:- उठल्या उत्साहाच्या त्या शांतश्रीमदुदधिवरि लहरी | धरितां हनु ननु ह्मणतां प्रणतांचें कां न सुदधि वरिल हरी २३ वैराटि ह्मणे नर्तन हो कीं वादन तथैव गायन हो । सारथि हो या समयीं एकहि वश कौरवासि गाय न हो२७ ऐसें वदे कवच दे त्याश्रितकुशलावहास ल्यायाला । तारणीं चुके तो कन्या पाहोनि हांसल्या याला ॥ २८ ॥ ज्याचें किरातरूपि-प्रभु-धिक्कृतिगर्भ गाय नाक वच | हांसे आपणहि ह्मणे ठावें मज काय गायना कवच ॥२९॥ KASHINATH G. KARATAL. 1 BHOR