पान:वामनपंडित १८८४.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कृपया जपून वापरा १०८ रस यांच्या योगानें तशा ग्राहकास ते कंटाळवाणें होत नाहींत. वामनानें विराटपर्व, सुदामचरित्र, मुकुंदविलास आदिकरून इतिहासरूप जीं प्रकरणें रचिलीं आहेत, त्यांत ग्रंथदृष्टीनें व काव्यदृष्टीनें ही, श्रांत झालेल्या मानसास प्रफुल्ल करून उत्तेजन आणि आनंद देण्याची शक्ति नाहीं. सुदामचरित्राच्या संबंधानें आह्मी दुसरी- कडे बरेंच विवेचन केले आहे त्यावरून आमच्या ह्मण- ण्याची सत्यता दिसून येईलच. आतां विराटपर्वाच्या सं बंधानें विचार करूं. महाभारताच्या पर्वीपैकी वामनानें रचिलेलें विराटपर्व मात्र आमच्या पहाण्यांत आले व त्यांतील शेवटीं लि- हिलेल्याः -- " जालें पर्व विराट राट मणिरे उद्योग आतां पुढें । " ऐकाया मन सावधान करिजे जे खोल अंगीं गुढें ॥” या पद्याच्या अर्थावरून त्यानें आणखी किती पर्वांवरही कविता केल्या असतील, किंवा कविता क राव्या अशी त्याची उमेद होती इतकें सिद्ध होतें. वि- राटपर्वांखेरीज बाकीची वामनाचीं पर्ने आह्मास मिळाली नाहींत व ती उपलब्ध आहेत असे ऐकण्यांतही आलें नाहीं. विराटपर्व हें स्वभावतः मोठें मनोवेधक आहे. त्यांत शृंगारवीरादि सर्व रसांचा समावेश आहे. तेव्हां वामन - पंडित आणि मोरोपंत ह्यांची तुलना करावयास ह्या पर्वा - सारखें पर्वच यावयाचें नाहीं; असे जाणून या पर्वाच्या संबंधानें पंतपंडितांची आह्मी तुलना करितों. ह्या लहानशा निबंधांत, पंतपंडितांच्या अति वि