पान:वामनपंडित १८८४.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०७ ) निपुणता अधिक दिसून येते. सुदाम्याची व त्याच्या कु- टुंबाची स्थिति, आणि त्या संबंधानें सुदामा आणि त्या- ची स्त्री ह्यांचें भाषण, हीं वर्णन करितांना मुख्यत्वें क रुणरस प्रतीतीस आला पाहिजे. व त्यांत भक्तिरसाचें कांहीं मिश्रण झालें तरी वर्णनीय विषयास तें अधिक अ नुकूलच होईल. परंतु अशा वर्णनप्रसंगी हास्य किंवा बीभत्स रस व प्रमादादि मनोविकार असावे अशी क ल्पना तरी होईल काय ? कधीं होणार नाहीं. असें अ- सतां वामनाच्या सुदामचरित्राच्या वरील उताऱ्यांत हास्य आणि बीभत्स हे रस स्पष्ट भरले आहेत. याशि- वाय प्रमादादि मनोविकार ही प्रतीतीस येतात. तसें मो- रोपंताचें नाहीं. त्याच्या वर्णनांत आरंभापासून शुद्ध क रुणरस असून मध्ये मध्यें भक्तिरसाची छाया दिसत आहे. तिच्या योगानें दुधांत साखर घातल्याप्रमाणें क रुणरसास फारच गोडी आली आहे. एकादा इतिहास किंवा कथानक ग्रंथांत जुळण्याची कुशलता वामनांत मोरोपंतासारखी नव्हती असें वाटतें. कवितात्मक पद्य रचावयास जी बुद्धिकुशलता लागते तीहून ग्रंथ रचना करावयास अधिक सूक्ष्म व्यापक व विस्तृत बुद्धिचातुर्य असावें लागतें. वामनास काव्या- त्मक पधें रचण्याची चांगली शक्ति होती; परंतु कोठें कोठें तीही असावी तशी उज्ज्वळ, उदात्त व मनोहर दि- सत नाहीं. वामनानें अद्वैतशास्त्रविचारावर जे जे ग्रंथ लिहिले आहेत ते ते सर्व पूर्णत्वानें व निःसंदेह व्याख्येनें समाधानास प्रसवतात. व त्यांत जरी ठरीव कल्पनांचीच वारंवार आवृत्ति झाली आहे, तरी तत्त्वमीमांसा व शांत-