पान:वामनपंडित १८८४.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०९ ) "स्तृत, अपरिमित व सघन काव्योद्यान तरुव्रजांच्या स कल पुष्पांची मालिका मासल्याकरितां लोकांपुढे ठेवि- ण्यास, गुंफितां येणें परमाशक्य. यास्तव त्यांतले कांहीं मासले गुणदोषांसह आह्मी दाखविले आहेत. त्याप्रमा- णेंच विराटपर्वांतील कांहीं कविता-कुसमें आह्मी लोकां- पुढें ठेवितों. विराटपर्वीतील कथा बहुतकरून सर्वत्र प्रसिद्ध आहे. शाळांतील क्रमिक पुस्तकांत उत्तरगोग्रहणकथेच्या आर्या घातल्या असून, नवनीतातही त्यांचे वेंचे घेतले या यो- गानें, आणि गांवोगांव फिरणाऱ्या नाटकांची अतिप्रवृत्ति झाल्यानें. ह्या कथेची लहान लहान मुलांस देखील उ त्तम माहिती झाली आहे. यास्तव या पर्वांतील कथा- भाग एथें सांगून विस्तार करण्याचें कारण दिसत नाहीं. उत्तरगोग्रहण ह्मणून जो वरील पर्वांत चमत्कारिक क थेचा भाग आहे, तो उभयतां पंतपंडित यांनी कसकशा प्रकारें वर्णिला आहे हे पाहिले ह्मणजे, स्थालीपुलाक- न्यायानें सर्व पर्वांचा, किंबहुना उभयतांच्या सर्वच का व्याच्या गुणदोषांचा निर्णय ठरवितां येईल. लावण्यवती चतुर कामिनी आपल्या सहज लीलेच्या नेत्रकटाक्षांनी रसिक पुरुपास प्रेमानंदांत निमन करिते; मग ती जर सहेतुक कटाक्षक्षेप करील तर कोणाच्या हृ- दयास जिंकणार नाहीं बरें ? मोरोपंताची स्वाभाविक वा- णीच झोंकदार, प्रौढ आणि ओजोगुणविशिष्ट आहे. तिच्या सहज अवलोकनानेंच तींत मन गर्क होऊन जातें. तशांत विराटपर्वामध्ये पंतास बहार करावयास पुष्क- ळच स्थल मिळाले आहे, त्या योगानें त्यांतील भाषेंत १०