पान:वामनपंडित १८८४.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०६ ) " भक्तीनें वश सत्पतीस करिती साध्वी मला सज्जन " प्रेमांभोनिधि संत त्यांत करितों मी मीनसा मज्जन | “ त्याला मीच मलाहि तेच रुचले ते हंस मी मानस “ श्री त्यांहींच मला मदीय भजनें त्यांचें सुखी मानस | “ सर्वस्व मी सज्जनांचें माझें सर्वस्व सज्जन " पावेन मी न पावेल कष्टीं मज्जन मज्जन । सुदासीं न उदासीन प्राकृत प्रभुही मनीं 66 66 कसा दास प्रसादास माझा पात्र नव्हे जनीं" ॥ हें अंबरीषाचें दुर्वासाशीं शेवटीं झालेले भाषण, अंब- रोषाची साधुता किती स्पष्ट करित आहे !! 66 6.6 राजा त्या मुनिला ह्मणे मज जडा देतां तुझी थोरवी पादें आपुलिया जसा विधुसि की रत्नासि देतो रवी । " केला हा निजदास वासवनुता सत्कीर्तिला भाजन " स्वामी युष्मदुपासनेच्छु कवणा पावे न लाभा जन ॥ तुह्मी प्रभु जगद्गुरु स्वपददासमंदार हा 66 "6 “ जन स्तविल काय या श्रुति ह्मणेल मंदा रहा । ह्मणोनि तुमचा मला सुमहिमा न वाखाणवे प्रकूपखनका कसा जलनिधी नवा खाणवे" || वरील कवितेंत पदलालित्य, प्रौढी, अर्थगौरव आणि उद्गार किती चांगले साधले आहेत !! चंद्रास सूर्यकिरणांनी प्रकाश मिळतो ही गोष्ट वरील कवितेंत जाणविली आहे यावरून मोरोपंताची बहुश्रुतता स्पष्ट होत आहे. वर सुदामचरित्राचा जो भाग उतरून घेतला आहे, त्यावरून रसपरिपाकादि गुणांत पंडितांपेक्षां पंतांची 66