पान:वामनपंडित १८८४.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०५ ) प्रौढी, गौरव, सौंदर्य इत्यादि गुण कमी झाले तरी हर- कत नाहीं; एथपर्यंतच्या सुगमतेविषयीं पंतानें आपल्या काव्यांत औदार्य प्रकट केलें नाहीं. या कारणानें जे लोक पुळपुळीत वाक्यांस कवितेंत गणितात, त्यांजला मोरोपंताची कविता प्रसादहीन दिसत असावी असें वा- टतें. वस्तुत: पंतानें आपल्या प्राकृत काव्यांत संस्कृतां- तील अति मनोहर शब्दांचें मिश्रण करून, प्राकृतभा- घेस व काव्यास मोठीच प्रौढी आणिली आहे. व कोठें कोठें उत्तम प्रसादही साधला आहे. वामनाचें सुदामचरित्र अक्षरगणांच्या कठिणवृत्तांत आहे, यामुळे त्यांत सहजच अधिक दोष आले असतील, आणि मोरोपंताचीं सुदामचरित्रे दोन्ही मात्रा- गणांच्या सोप्या छंदांत रचिलीं आहेत या कारणानें तीं सहज अधिक निर्दोष असतील, अशी शंका घेण्यास तर जागा नाहींच; परंतु कोणी ती मनांत आणिली तरी तिचेंही दूरीकरण व्हावें या हेतूनें असें सांगतों कीं, आह्मी काढिलेले गुणदोष केवळ पद्यरचनेंतील च्युतसं- स्कृति इत्यादि कारणावर अवलंबून नाहींत. ते केवळ अर्थाच्या व ग्रंथरचनेच्या कारणांनी दाखविले आहेत. कोणत्याही वृत्तांत काव्य लिहिलें तरी वृत्ताच्या का- ठिण्यामुळे वर दाखविलेले दोष कदापि घडावयाचे ना- हींत. यास्तव मुळींच वरील शंका रहात नाहीं. मोरोपंतानें अक्षरगणांच्या वृत्तांनी ही वरीच कविता . केली आहे. त्यांतील अंबरीषनामक राजाचें चरित्र प हाण्यांत आले. त्यावरून श्लोकांत देखील कविता रच- ण्याची उत्तमच शक्ति मोरोपंतांत होती असे दिसतें. 16 MAR 1990