पान:वामनपंडित १८८४.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शतकांत झाला. वामनानें आपलें वृत्त किंवा कुलवृत्तांत पृथक्षणें लिहून ठेविला नसून भीष्मयुद्ध व प्रियसुधा या प्रकरणांच्या शेवटी त्यानें आपली जी माहिती जाण- विली आहे ती फारच थोडी आहे. तिजवरून कालनि- र्णय किंवा स्थलनिर्णय सुद्धां होत नाहीं. याशिवाय दुसऱ्यानेंही कोणी स्वतंत्रपणे वामनपंडिताचें चरित्र लिहिलेले आढळत नाहीं. यामुळे या कवीचें चरित्र समजण्यास कांहींच साधन नाहीं. आपल्या देशांत मो- ठमोठाल्या चक्रवर्तीराजांचाही असावा तसा इतिहास लिहून ठेवण्याची पूर्वी चाल नव्हती, या कारणानें ग- तकालाकडे दृष्टि दिली तर, महाघोरांधकारांत कोठें कोठें मंद मंद लिकलिकणारे दिवे व काजवे चमकतात अशीं कांहीं महापुरुषांचीं सूक्ष्मवृत्ते मात्र आढळतात. दिनमणीसारख्या तेजस्वी राजांची जर इतिहाससंत्रं- धानें ही दशा, तर मग आमच्या कविमणीचा तेथें इति- हास नाही ह्याचें कांहींच आश्चर्य नाहीं. आतां वामनाविषयी त्याने स्वतः किंवा दुसऱ्यानें कोणीही लिहून ठेविलेलें वृत्त जरी आढळत नाहीं, तरी वामनाला मरून सरासरी २०५ वर्षे झाली असून, ऋग्वेदोत्तम आश्वलायन महा शाखांबुधी जाणिजे ॥ वर्णी विठ्ठल दुग्ध- सागरकुलालंकारचूडामणी । पर्ने प्राकृत सप्तसर्ग तिनशें त्रेपन्न चिंताम- णी ||६७|| रुक्मिणीस्वयंवर || स्वस्तिश्री नृपशालिवाहनशके (१५९९ ) व्याण्णवू पंधरा | अब्दीं पिंगल चैत्रशुद्ध नवमी श्लोकांकसंख्या धरा || त्रीषट्के शिवनेत्र श्लोकरचना संपूर्ण झाली कथा | वक्तासत्कविराज विठ्ठल ह्मणे दोषाक्षमानान्यथा || ४६ || सीतास्वयंवर सर्ग ७, या- वरून वामनपंडितास श्लोकांचा आद्यकवि ह्मणण्यास हरकत येत नाहीं.