पान:वामनपंडित १८८४.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०४ ) फार कमी आहे, असा पुष्कळ लोकांचा अभिप्राय आहे. व 1" प्रसादवत्प्रसिद्धार्थमिंदोरिंदीवति । 'लक्ष्म लक्ष्मीं तनोतीति प्रतीतिसुभगं वचः ॥ 66 "" काव्यादर्श. यो लक्षणाप्रमाणे प्राकृतभाषेतील प्रसिद्धार्थवाचक पर्दे पंतांच्या काव्यांत कमी असून संस्कृताचा भरणा फार आहे ही गोष्टही खरीच आहे. मोरोपंतानें स्वतांच्या काव्यरचनेच्या संबंधानें झटलें आहे कीं, गीर्वाणशब्द पुष्कळ जनपदभापाचि देखतां थोडी । यास्तव गुणज्ञलोकीं घ्यावी याची हळू हळू गोडी ॥ • प्राकृत - संस्कृत - मिश्रित यास्तव कोणी ह्मणेल ही कंथा । भवशीतभीतिभीत-स्वांताला दाविला बरा पंथा ॥ स्फुट. पुष्कळ आ करण्याकरितां यावरून प्रसिद्धार्थवाचक प्राकृतपदें काव्यांत घा- लावयाची नाहीत, असा पंतांचा हेतु नव्हता. देश- भाषेंत मूळचे शब्द थोडे व संस्कृत शब्द हेत. यास्तव पाहिजे तसें सरस वर्णन आह्मी मोकळ्या मनानें गीर्वाणशब्दांचें मिश्रण करित आहों. असा भावार्थ मोरोपंतानें दाखविला आहे. अर्थात् प्राकृत प्रसिद्धार्थदर्शक पदें मिळतील तशीं धुं- डून काढून कवितेंत घालावीं; मग त्यामुळे कवितेची १ " प्रसिद्धार्थपदत्वं यत् स प्रसादो निगद्यते " प्रतापरुद्र.