पान:वामनपंडित १८८४.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०२ ) त्याच्या तुझीच गातां प्रेमें नेमें सदा चरित्रास की त्रास हरि भवाचा भेटा जी एकदा स्वमित्रास ॥१३॥ डोळेभरि अवलोका लोकाधारा तथा महाभागा । आगारा श्रीच्या मी स्वामी ह्मणत्यें पहावया भागा ॥ १४ ॥ दीनकुटुंत्रप्राणत्राण द्रव्याविणें कसें होय । तो यक्षपेश चित्तें वित्तें देईल घन जसें तोय ॥ १५ ॥ त्यासम तोचि उदार स्वात्मार्पण ही हरी करी राजे । या जे भूवरि दाते तेहि उणे अर्पिते शरीरा जे ॥ १६ ॥ भजकां कामित जो दे तो देव द्वारकापुरी आहे । लोक सकाम अकाम हि महित गुणा त्याचिया पदापाहे ॥ १७ जो मेघ कूप पलवल वापी कासार शत महासरिता | भरि तारका तयाचा कां राहे चातकाख्य दास रिता ॥ १८ ॥ दीनाचा बंधु प्रभु विश्वात्मा त्या मुखें असें बोधी । तो धीरमणि पहावा भावाची दर्शनोत्सुका हो धी ॥१९॥ त्यावर हें सुदाम्याचें भाषण पहा:- - विप्र ह्मणे बहु बरवें भेटेल सखा महेंद्रनीलाभ । 'स्त्रीला भव्यचि सुचलें याहुनि दुसरा नसे जनीं लाभ |॥ २० ॥ काय उपायन आहे आणी द्याया सख्यास कल्याणी | पाणी रिक्त नसावा स्मृतिकारांची असी असे वाणी ॥२१॥ आपुलिया यदुवीरा दीरा द्यायास काय देतीस । नेती सप्रेम सखे भेटि सख्याला असें वदे तीस ॥ २२ ॥ बृहदशम.