पान:वामनपंडित १८८४.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०१ ) • नता इत्यादि गुण आणि सुदाम्याच्या स्वभावांत निस्ट- हता, उदासीनता, भगवन्निष्ठा हे गुण चांगले दाखविले आहेत. वर्णनीय वस्तूच्या स्वभावविरुद्ध, विसंगत किंवा अप्रयोजक अशा वर्णनाने झालेला दोष, पंतांच्या दोन्ही प्रकरणांत कोठेही आढळत नाहीं. तेव्हां ग्रंथसंबंधानें ही प्रकरणें निर्दोष व स्तुत्यर्ह आहेत, यांत कांहीं सं- शय नाहीं. आतां कवितासंबंधानें पहातां, निर्दोप शब्दार्थानों, अभियुक्त विशेषणांनीं, सुंदर अलंकारांनी आणि निय- मित यमकांनी पंतांचीही ही कविता रसाने ओतप्रोत भ रलेलीच दिसते. हे सुदाम्याच्या शरीराचें व दारिद्र्याचें कसें खुबीदार वर्णन केले आहे पहा :- शुष्करसा जसरिता तैसी गत-काम- कोप- विप्र-तनू । दुष्कर साध्वी करि तप तत्तनु न स्वार्थ लोपवी प्रतनू ॥६॥ दंड उदंडचि साहे जैसें तद्वपु तसेंचि तहसन | व्यसन श्रीशव्यानीं न स्फुरवी क्लेश तें सदभ्यसन ॥ ७ ॥ इतरुचि-वसनें मलिनें कलिने अस्पष्ट साधु लोक मळें । की जेवि मुकुरविंवें की शैवालेंहि झांकिलीं कमळें ॥८ हें सुदामस्त्रीचें अतिनन्न भाषण पहा:- अयि विद्वन्मुकुटमणे स्वामी तुमचा सखा रमावर कीं । न पडे पापी यन्नामें सदय तो नतावरकीं ॥ ११ ॥ अजि त्या ब्रह्मण्यातें करुणावरुणालया शरण्यातें । त्यजिति न सरा जसे बक सेवक मृग कल्पतर्वरण्यातें ॥१२॥