पान:वामनपंडित १८८४.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०० ) रून एक तर पंडितास असा कोठें प्रसंग घडला असावा, अथवा एकाद्या भिक्षुकानें गमतीनें असा मजकूर पंडितास सांगितलेला, किंवा कविता करिते समयीं त्यास स्मरला असावा असे वाटतें. सुदाम्याच्या तोंडांत हें भाषण घा- तल्यानें जे दोष होतात ते आह्मी वर दाखविले आहेत; परंतु स्वभावोक्तीवर पंडितांची प्रीति होती त्याप्रमाणें ती एथें दिसते, हा गुण मानिला पाहिजे. वामनाच्या साऱ्या सुदामचरित्रांत स्वभावोक्ति हा अलंकार सर्वत्र चांगला साधला आहे. याशिवाय आ णखीही गुणदोष त्यांत सांपडतात; परंतु ते सर्व विस्ता- रभयास्तव एथें देत नाहीं. मोरोपंताचीं दोन सुदामचरित्रें आढळलीं ( १ ) बृ- हद्दशमांतील अध्याय ८० । ८१ गीति छंद. आणि ( २ ) पृथुकोपाख्यान साकी छंद. मोरोपंतानें प्रथम गीतिछंदोबद्ध सुदामचरित्र गाऊन नंतर तें साकीछंदोबद्ध गाइलें आहे. असे दिसतें. " वाणी पवित्र करावयास्तव पृथुकोपाख्यान सुखें, " लेशमात्र वर्णिलें पुनरपि मयुरेश्वरें स्वमुखें ८७” पृथुकोपाख्यान. मोरोपंताच्या ष्टृथुकोपाख्यानांत पहा, किंवा बृहद्दश- मांतील सुदामचरित्रांत पहा, काव्याचें लावण्य सारखीच झकाकी मारित आहे. ग्रंथसंबंधाने पाहिले तर या च रित्रांत वर्णनीय सुदामा व त्याची स्त्री हें साधुदांपत्य मुख्य होय. ग्रंथारंभींच वर्णनीय दांपत्याचें यथातथ्य व र्णन असून, पतिव्रतेच्या भाषणांत मार्दव, माधुर्य शाली-