पान:वामनपंडित १८८४.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९९ ) सुदामा यद्यपि दरिद्री होता, तथापि तो सत्वगुण वि- शिष्ट मोठा भगवन्निष्ठ साधु होता. तो आत्मज्ञानी अ सून भगवान् श्रीकृष्ण ह्याचा परमभक्त होता. परदोषो- चार किंवा परनिंदा हीं स्वप्नांत देखील ज्याला ठाऊक नव्हतीं; त्यानें यथेच्छ दोपोद्घाटन करणें ही अप्रयो- जकता व श्रीकृष्णदर्शनाची गोष्ट त्याच्या पुढे आल्या- बरोबर त्यानें प्रेमानें तन्मय होऊन जावयाचें तें एकी- कडे राहून, धनाढ्य लोकांचे दुर्गुण वर्णन करण्यास आरंभ करणें, अर्थात् श्रीकृष्ण धनाढ्य त्यासही ती गोष्ट लागू झाली. त्या योगें झालेला मोठा प्रमाद फार स्पष्ट होतो. आतां तत्त्वतः हा अप्रयोजकपणा व प्रमाद सुदाम्याचा नसून तो आमच्या पंडितांचा आहे, हें थोडासा विचार केला ह्मणजे लक्ष्यांत येतें. साधुचरितांत साधुकवींनीं अशा प्रकारें दोष केले तर, त्यापासून एकंदर भाषाग्रं- थांस दूषण लागण्याचा संभव आहे. यास्तव पद्यरचना अथवा काव्यरचना या संबंधानें जरी निर्दोषता कमी अ- सली तरी चिंता नाहीं; परंतु ग्रंथरचनेंतील शुद्धतेकडेस ग्रंथकारानें विशेष लक्ष्य पुरविले पाहिजे. एकादें नाटक रचितांना पूर्वापर संबंध, संविधानक- पात्रांच्या योग्यतेप्रमाणें त्यांचें भाषण इत्यादि गोष्टीं- कडे जसें अवश्य लक्ष्य दिलेच पाहिजे, तसें हरएक ग्रंथ रचितांना त्याच्या महत्त्वाप्रमाणें उचितार्थता अवश्य राखिलीच पाहिजे. संपत्तिमान् गृहस्थभिक्षुकांचा त्रास व हेलना करि- तात हें पंडितानें सुदाम्याच्या भाषणांत जाणविलें; याव- >