पान:वामनपंडित १८८४.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९८ ) 66 " तयीं चित्तीं दुःखें परम उपजेती न धरवे । क्षमा पाहों जातां तदुपरि हि आह्मा न करवे ॥ २४॥" परधन परदारा सर्व दोषापहारी । 66 " अनुदिन प्रिय कांता-काम-संगी विहारी || किमपि हि न करी जो सज्जनासी प्रवृत्ती । “ अति कठिण घडेना साधु-निंदा निवृत्ती ॥२७॥” ' देखतां ऋषि तयासि न पूजी । " वाटतो द्विज तयास रिपू जी ॥ “ भोंवयी करुनि वक्र पहातो । 66 66 " मित्र भिक्षुक अमान्य अहा तो ॥ २८ ॥” न तो हालवी मस्तकातें कदापी । 'दुरूनीच तो शुष्क-शब्देंचि दापी || “ तयीं बोबडी ते वळे भिक्षुकाची । 66 66 “ न ते गोष्टिही गोड बोले फुकाची ॥ २९ ॥ “ अलक्ष्मीसलक्ष्मीस तो वैरभाव । स्त्रियांचाच नैसर्गिकी तो स्वभाव | म्हणूनीच शत्रुत्व या संततीतें । “ विचारूनि पाहें सती तूं मतीतें ।। ३० ।। याप्रमाणें सुदाम्याचें भाषण स्वभावतःच अप्रयोजक दिसत असून, ते भगवान् श्रीकृष्णाच्या भेटीविषयीं वि- चार चालला असतां, ज्याची भेट घ्यावयाची त्याच्या ऐश्वर्यास व आपल्या दारिद्र्यास स्मरून सुदाम्यानें केलें आहे. हें मनांत आलें ह्मणजे सुदाम्याचा केवढा हा प्र- माद असे वाटल्यावांचून राहत नाहीं. 66