पान:वामनपंडित १८८४.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नासा-पुटीं तो भरणी जयांची । अन्यत्र नाहीं गणना तयांची ॥ “ ज्या मस्तकींच्या कबरीभरानें । " सभोवती दंग भुजंग-रानें ॥ ११ ॥ सुदाम्याची स्त्री सुशीला पतिव्रता असतां तिच्या भा- •षणांत दुर्वृत्तता व कठोरता पंडितानें दाखविली आहे. “ कांता सती होउनियां जयाची । संतोषवार्ता न करी जयाची ॥ १२ 'दुर्गंधि ती कधिंचही न चुके मुखाची । " शय्यासनीं किमपि गोष्टि नसे सुखाची || 'तांबूलहीन-वदना- घर-पान-काळीं । “ स्वप्नीं परंतु हि कधीं न पडे सुकाळीं ॥ १७॥ " परम शुष्क तुझ्या अधरासिया । “ रसविहीन अपेक्षित कासया ॥ जालिया वमन ही न मिळे कीं । 'तूज तें क्रमुक फोडि फळें कीं ॥ १८ ॥ ” “ कोण सौख्य ह्मणवूनि क्रमावें । " जें परस्पर मिळोनि रमावें ॥ 66 66 66 " स्नेहशून्य वरि भार जटांचे । “ व्यर्थ हे वरुनि पाय भटांचे ॥ १९ ॥ इत्यादि. हें सुदाम्याचें भाषण पहाः- 66 सुदामा बोले की जरि वदसि जा तूं मज सती । “ अहो तेथें गेल्या सकळजन देखोनि हंसती || ९ --