पान:वामनपंडित.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीसरस्वतीमंदिर. निष्कंटक करण्याच्या कामी पंडितांची योग्यता इतरांपेक्षां कांकणभर जास्तच होती, हे त्यांच्या ग्रंथांचे सूक्ष्म परिशीलन केले असतां स्पष्टपणे नजरेस येते. पंडितांनी अश्रान्त परिश्रम करून, आपले सर्व बुद्धिवैभव खचून व ज्ञानयुक्त सगुण भक्तीने रसरसून, मुमुक्षुजनांसाठी, भगवद्भक्तिगौरवासाठी व दुर्मतखंडनासाठी जी प्रचंड ग्रंथरचना मराठीत केली आहे, तिच्याविषयी जुन्या पंडितमंडळींत तसेच नव्या शिक्षितवर्गात बहुतेक एक नमुन्याचेच औदासिन्य आढळून येते. ज्ञानेश्वरांची जशी भावार्थदीपिका ऊर्फ ज्ञानेश्वरी, एकनाथांचे जसें भागवत, किंवा समथाचा जसा दासबोध, तशीच पंडितांची यथार्थदीपिका. परंतु पहिल्या तीन 'ग्रंथांशी विद्याव्यसनी लोकांचा जितका परिचय आढळतो, तितका चवथ्याशी आढळत नाही, आणि म्हणून ज्ञानेश्वरादिकांसंबंधे जेवढी वाटाघाट होते, तेवढी पंडितांसंबंधे होत नाही. त्यांचे चांगलेंसें चरित्र किंवा त्यांच्या काव्यांच मार्मिक व विस्तृत परीक्षण प्रसिद्ध झालेले नाही. पंडितांच्या नावावर मोडणारे अनेक ग्रंथ आहेत, परंतु त्यांपैकी खुद्द त्यांचे किती यासंबंधी नक्की असें कांहींच ठरले नाही. या दिशेनें कै० हंस व बाळाजी आणि कंपनी यांनी थोडासा प्रयत्न केला होता; परंतु तो पुढे कोणीच चालविला नाही. काव्यसंग्रहकारांनी वामनी ग्रंथ छापतांना वरील गोटींचा ऊहापोह केला नाही, किंवा हंस व बाळाजी आणि कंपनी यांच्या श्रमाचा: चांगलासा उपयोग करून घेतला नाही. पंडितांचे समग्र ग्रंथ छापण्याचे आजपर्यंत एकंदर दोनच प्रयत्न झालेले पाहण्यांत आहेत ; एक बाळाजी आणि कंपनी यांचा व दुसरा निर्णयसागराच्या मालकांनी चालविलेल्या काव्यसंग्रहाचा. पैकी पहिला प्रयत्न १८९१ साली सिद्धीस गेला व दुसरा अद्याप चालू आहे. परंतु ग्रंथसंख्येसंबंधे त्यांचा एकमेकाशी मेळ बसत नाही. त्यामुळे प्रसिद्ध झालेल्या प्रकरणांत खुद्द वामनीम्हणजे यथार्थदीपिकाकारांची प्रकरणे किती आहेत, याविषयी वारंवार शंका येते; आणि कित्येक वेळां मुक्रर करणे मुष्किलीचे व प्रसंगी अशक्यही होते. *नवनीतकार सांगतात की, यथार्थदीपिका व निगमसार ही प्रकरणे जमेस धरतां एकंदर वामनी प्रकरणे सुमारे ४२ आहेत. कै.

  • नवनीत, आवृत्ति ४ थी, सन १८९५.