पान:वामनपंडित.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वामनपंडित. हंस आपल्या पंडितांवरील निबंधाच्या अखेर एका यादीत पंडितांची म्हणून १०० प्रकरणांची नामावळी देतात आणि काव्यसंग्रहकार, प्रकरणांच्या रदबदलीसंबंधे किंवा छाटाछाटीसंबंधे एक अवाक्षरही न काढतां, ९३ प्रकरणे प्रकाशित करितात! तेव्हां हा कोण ब्रह्मघोंटाळा ! आजपर्यंत काव्यसंग्रहांतून वामनी ग्रंथांचे जे तीन स्फुटभाग प्रसिद्ध झाले आहेत, त्यांत एकंदर ग्रंथसंख्या ९,३२१ आहे व अजून यथार्थदीपिका पुरी व्हावयाचीच आहे. तिचे आजपर्यंत दोन भाग मिळून नऊ अध्याय संपले आहेत आणि तिसरा भाग हल्ली छापत आहे. यथार्थदीपिकेंत एकंदर २२,२६६ ओव्या आहेत; म्हणजे पंडितांच्या नावावर मोडणाऱ्या ग्रंथाची संख्या ३१,५८७ आहे. यांपैकी किती कृति खास यथार्थदीपिकाकारांची ठरविता येते, कितीविषयी संशय येतो व किती त्यांची नाही असे बिनधास्त म्हणतां येते, यासंबंधे प्रस्तुत निबंधांत खल करण्याचे योजिले आहे. अर्थात् यासंबंधे वाटाघाट करितांना पंडितांचें इतिवृत्त, मते, स्वभावचर्चा, भाषेची शैली वगैरेविषयी चर्चचा फारच उपयोग होणार आहे, हे उघड आहे. २. मराठीतील बरेचसे प्रसिद्ध कवि संत, साधु, योगी किंवा भगवद्भक्त या नात्यानेही विख्यात आहेत. त्यांतील कित्येकांनी आपल्या अलौकिक चारित्र्याने, प्रेमळ पण अधिकारप्रयुक्त वाणीने आणि भक्तीच्या एकतानतेने समाजावर विलक्षण छाप बसवून, त्याची मनें आपल्या अगदी अंकित करून टाकिली व म्हणूनच लोक त्यांना ईश्वरी अंश किंवा अवतार मानीत व अद्यापही मानितात. अशा महाव्यक्तींची चरित्रे त्यांच्या शिष्यांनी व भक्तांनी मोठ्या प्रेमभावाने लिहून ठेविलेली आहेत. या चरित्रग्रंथांतून पौराणिक कथानकांप्रमाणे मधून मधून अनेक असंभाव्य प्रकार व अद्भुत चमत्कार वर्णिलेले असून, या संतादिकांच्या अंगी सिद्धीच्या व भक्तीच्या जोरावर कर्तुमकर्तुमन्यथाकर्तुम् शक्ति आलेली होती, असे दाखविलेलें *आहे. अशा त-हेच्या वर्णनांवर व चमत्कारां

  • ज्ञानेश्वर, चांगदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम इत्यादिकांची चरित्रे व हनुमंतस्वामीकृत रामदासस्वामींची बखर ही पुस्तके वाचली असतां, आमच्या वरील विधानाचें सत्य वाचकांच्या तत्काल अनुभवास येईल.