पान:वामनपंडित.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वामनपंडित. (वृत्त व ग्रंथ.) श्रीपति भक्तोत्तम जो गावा तद्रूप वामनस्वामी, । ज्या होउनि लुब्ध म्हणे, 'त्यजिन' श्रीकृष्णनाम 'न स्वा मी.'॥१॥ सगुणश्रीहरिभक्त ख्यात ज्ञात्या जनांत हा शुकसा,। बहुजन्मसिद्ध ऐसा साधेल सुपक्व योग आशु कसा? ॥२॥ केली श्रीगीतेची व्याख्या, बहु भक्ति जींत गाजविली,। साजविली साधुसभा, भाषाकविकवनशक्ति लाजविली. ॥३॥ -मोरोपंत. १. इसवी सनाच्या तेराव्या शतकांतील श्रीमज्ज्ञानेश्वरांपासून तो तहत अठराव्या शतकांतील महीपतिमोरोपंतांपर्यंत जे नांवाजण्यासारखे अनेक मराठी कवी झाले, त्यांतील अग्रेसरांत वामनपंडित हे मोडतात. सुश्लोक वामनाचा, अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, । ओवी मुक्तेशाची, किंवा आर्या मयूरपंताची॥ या रामचंद्रपंत बडव्यांच्या आबालवृद्धांच्या तोंडी बसलेल्या गीतीवरून हे उघड आहे की, सामान्य जनांत वामनपंडितांची प्रसिद्धि | त्यांच्या मंजुळ, रसाळ, कोमल व यमकानुप्रासालंकृत श्लोकरचनेवरूनच आहे. त्याप्रमाणेच या पंडितांची पांडित्यप्रौढी व तिचा परिहार यांसंवंधेही बऱ्याच दंतकथा लोकांत पसरलेल्या आहेत. परंतु साधु किंवा भगवद्भक्त या नात्याने पंडितांचे स्मरण झालेले क्वचित्च आढळते. ज्ञानेश्वर, तुकाराम किंवा रामदास या प्रसिद्ध भक्तांच्या शिष्यशाखा फारच विस्तृत असून, त्यांचे वार्षिकोत्सव मोठ्या थाटानें व भावनिष्ठेने करण्यांत येतात. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, रामदास, मोरोपंत इत्यादिकांच्या पुण्यतिथी निरनिराळ्या त-हांनी साजऱ्या केलेल्या आपण पाहातों व ऐकतो, परंतु वामनपंडितांसंबंधैमात्र अशी चळवळ कोठेच दृष्टोत्पत्तीस आलेली नाही. भगवद्भक्त या नात्याने वामनपंडित वरील संतमंडळीपेक्षा अणुरेणूही कमी नव्हते ; किंबहुना भागवतधर्माचा मार्ग उजळ व