पान:वामनपंडित.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीसरस्वतीमंदिर. प्रवृत्तिप्रसंगांत दावी निटत्ती। तया माधवातें समर्पूनि वृत्ती॥ कथा वर्णिली वामनें केशवाची। जगी धन्य तो यांस जो लेश वाची ॥ ९४ ॥ -कात्यायनीव्रत.. अशी रासक्रीडा मदनशर अध्याय रचिली। प्रवृत्तीच्या लीलांहुनि बहु निवृत्तीच रुचली ॥ निवृत्तीवांचूनी न किमपिहि वृत्तांत गवसे । दिसे ब्रह्मीं त्याला जग कनकि जैसा नग वसे. ॥१५२ । प्रवृत्तीची लीला निजरस निवृत्तींत मिरवी । प्रवृत्ती वृत्तांत त्वरितचि निवृत्तींत फिरवी ।। भवार्ता हे वार्ता निववुनि विवर्ता परिहरी । रमाभर्ता कर्ता करुनिहि अकर्ता परि हरी. ॥ १५ ॥ -रासक्रीडा. ' या संबंधाने राधाभुजंग ५४-५५ व जलक्रीडा २४ हेही श्लोक पहावे. परंतु निवृत्तीचा उपदेश करूं निघणाऱ्या वामनाने मूळ भागवतावर अश्लीलपणांत ताण करून, शृंगारिक वर्णने मर्यादेस झुगारून देऊन बीभत्सतेच्या पराकाष्ठेला न्यावी, यासारखा आश्चर्यकर असंबद्धतेचा दुसरा नमुना आढळेल असे आम्हांस वाटत नाही. आपण भक्तिगौरवासाठी जे काव्य लिहीत आहों, ते काव्य रतिमंजरीच्या किंवा अनंगरंगाच्या तोडीचें न होण्याबद्दल कवीने काळजी घेऊ नये, यापेक्षा अधिक लाजिरवाणें तें काय? महाराष्ट्र सारस्वतांत रा. भावे म्हणतात, “पंडितांच्या काव्यांत बीभत्सपणा अनेक ठिकाणी आढळतो व कित्येक ठिकाणी तर अगदीच गरज नसतांही त्याची योजना केली आहे. यांच्यासारख्या जाड्या कवीने व विद्वान् पंडितानें असल्या घाणेरड्या प्रकारांत लवमात्र तरी आनद मानावा, हे जरा विपरीत दिसते.” (पृष्ठ ५८) हे रा. भाव्याच म्हणणे अगदी रास्त आहे; व म्हणूनच आह्मी असे म्हणण्याचे धाष्ट्रय करितों की, ही काव्ये (आणि याच काव्यांस उद्देशून रा. भाव्यांचे विधान आहे) यथार्थदीपिकाकारांची नव्हेतच. यांचे कर्ते कोणी तरी निराळेच रंगेल शृंगारी वामनकवी असावेत.