पान:वामनपंडित.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीसरस्वतीमंदिर. विराटपर्व, भागेवतीरामायण व द्वारकाविजय या प्रकरणांतही हा यमकगर्व ढळढळीत दिसतो. दुसऱ्या अनेक वामनी प्रकरणांत या प्रकरणांपेक्षाही अधिक सुंदर यमकें साधली असतां, तेथें अशी प्रौढी प्रकट केलेली आढळत नाही, म्हणून तर या वामनाला निवडून वेगळा काढितां येतो. भागवतीरामायण, अ० १ श्लोक ३२ यांत यमकास्तव मुळचा छंद समश्लोकींत ठेविला नाही असें कवी सांगतो. विराटपर्वांत कवीनें ज्ञानेश्वरांचा दोनदा मोठ्या पूज्यभावाने उल्लेख केला आहे. पशूच्या मुखीं बोलवी वेद गा रे! अहंपडितां देत हट्टे दगा रे॥ असा चिन्मणी भाविकांचा धणी रे । त्यजूनी न घे कामकांचा धणी रे॥ -अ०६ श्लो० १९९. परमनिगम बोले ज्ञानराजा हल्या हो। नवल मजमुखेंही ग्रंथ हा जाहल्या हो? ॥ -अ. ८-१२७. यावरून हा 'यमक्या वामन' समर्थशिष्य असावा या अनुमानाला दुजोर येतो. मनास बोध' ' लोपामुद्रासंवाद' 'हनुमंतस्तव' 'करुणाष्टक' 'वामनबोध' 'शुकाष्टक' 'नामाष्टक' 'दत्तस्तव' 'तुकारामस्तुति' वगैरे प्रकरणे याच कवीची असावीत. यांतील 'विराटपर्व' प्रकरणांत दोन तीन अध्यायांत गणपतीला नमन केलेले आहे. यावरून हे काव्य पंडितांचे नाही हे तर निर्विवाद ठरते. पण ही गोष्ट समर्थशिष्याच्या १. अ. ८, श्लो. १२८ व १३१ पहा. २. अ. १ श्लो.३२ व अ. २ श्लो. ३३ पहा. 1..३. विजय २-श्लो. ४४ पहा. ४. द्वारकाजियांत पुढील श्लोक आढळतोः-महात्मा असा शब्द गीतेंत नाना। तया वाचिंतां ते करीती तनाना । प्रमाणा जयालागि ओव्या मराठ्या । धरीती करी काठिया उरफाट्या. ॥ ४ १८९. यांतही ज्ञानेश्वरीचा उल्लेख असेल असे वाटते. ५. यांत गोपिचंद व भर्तृहरी यांच्या उपरतीचा उल्लेख आहे. रामदासी मनाच्या श्लोकांच्या धाटणीवरच हे श्लोक रचण्याचा प्रयत्न केलेला आहे. ६. यांत रामदासी करुणाष्टकांचे अनुकरण आहे. ७. काव्यसंग्रहांत छापलेल्या या प्रकरणांतील चार श्लोक (११-१४) शुकाष्टक नांवाच्या प्रकरणांत शब्दशः तसेच आढळतात.