पान:वामनपंडित.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वामनपंडित. के सवध (प्रथम ) हे काव्यही याच कवीचे आहे. सीतास्वयंवरांत चापभंगासाठी रामचंद्र उठला असतां व कंसवधार्थ कृष्ण सिद्ध झाला असतां प्रेक्षकांत जे निरनिराळे रस उद्भवले, त्या दशरसांची वर्णने दोन्हीं प्रकरणांत बरीच सारखींशी दिसतात. शृंगाररसवर्णनांत तर विचार व शब्द बहुतेक तेच आढळतात. अनंगरंगांबुधिच्या तरंगीं । रंगी शुभांगी जडि अंतरंगी ॥ भंगील हा हो धनु केंवि रंगी? । म्हणे कुरंगी नयनी सुरंगी ॥ -सीतास्वयंवर, २०० सर्वांग शृंगाररसास नेत्रीं। की रंग दावूनि कुरंगनेत्री॥.... अनंगरंगांबुधिच्या तरंगीं । रंगी करी व्याकुळ अंतरंगीं ॥ -कंसवध ११. 'गजेंद्रमोक्ष' व 'वामनचरित्र'ही याच वशिष्ठान्वयी वामनाची असतील, असा अंदाज भाषासरणीवरून होतो या सर्व प्रकरणांची भाषा बरीच शुद्ध, श्रवणमधुर व शब्दार्थालंकारमंडित आहे. वर्णनांतून स्वभावोक्ति चांगली वठली आहे व ठिकठिकाणी ध्वनि व अर्थ यांची मोहक रीतीने साजेशी सांगड कवीने घातली आहे. तेव्हां या वामनाची कविता एकंदरीत चांगलीच हृदयंगम व रसाळ आहे. (२) यमक्या वामन. हा बहुतकरून समर्थशिष्य वामन असावा. याने आपल्या काव्यांतून ठिकठिकाणी आपल्या यमकांची प्रौदी मिरविलेली आढळते. यमकाकरितांच केवळ छंद बदलल्याचेही कवीने एक दोन काव्यांत स्पष्ट लिहिले आहे. अशा प्रकारचा यमकाभिमान पुढील काव्यांत आढळतो. हरिगुणी ग्रथिल्या यमका पहा । धरिल थोर भयें यम काप हा ॥ हरिगुणांविण हो यमका करी । तरिन दंड धरी यम कां करीं?॥९॥ रामतुष्ट अशिया यमकां हो । आणिखी नियम संयम कांहो? वामने हरिगुणी रसनेला । अर्पिता, अनुभवीं रस नेला ॥ ९२ ॥ -भरतभाव.

  • हेंच अर्ध भगवत्स्तुति या प्रकरणाच्या शेवटीं उगीच घुसडलेले आढळते. काव्यसंग्रह, पंडितकृत स्फुटकाव्ये भाग ३ पहा.