पान:वामनपंडित.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीसरखतीमंदिर. गातां तेचि शुकादि गोत्रज बळी मध्ये वसिष्ठान्वयी। माझा वामन राम गाइल तयीं लक्षुनि सर्वान्वयीं ॥ -रामजन्म, ४६ व सीतास्वयंवर, २०. तसेंच रामजन्मांत पुढील श्लोक आहे:उपाध्याय रामास माने; मुनी हो! स्ववंशीं स्मरे भक्त जो नेमुनी हो ॥ सुखें रामसेवी अशा गोत्रजाला; स्मरोनी ऋषीमात्र संतुष्ट झाला. । ४७॥ नृहरिदर्पण या काव्याची रचना हुबेहुब सीतास्वयंवराप्रमाणे आहे. रामाने शिवचाप मोडलें व नृसिंह स्तंभ फोडून बाहेर आला, या दोन्ही वेळच्या वर्णनांतील विलक्षण साम्य पाहिले, म्हणजे दोन्ही काव्यांचा कर्ता एकच होता, असे मानल्यावांचून सुटकाच राहत नाही. शिवचापभंगाचा प्रसंग: कड कड कड चापी जेधवां शब्द जाला । तड तड विधिअंड त्रास दे अब्जजाला ॥ तडफडि फणिराणा, कंप भूमंडलाला । खडबडि कनकाद्री धाक आखंडलाला ॥११॥ भांड ब्रह्मांड अखंड । सातादीपां खंडखंड । होऊ पाहे खंड खंड । गगन गडाडिलें । राक्षसांत मुंड मुंड । रावणादि पुंड पुंड । होती त्यांचे पिंड पिंड । हृदय तडाडिलें ॥ भ्याले भूप लंड भंड । जगदिग्गज उदंड । तोंडी उगाळितां गंड । शोणित भडाडिलें ॥५२॥ आतां स्तंभस्फोटाचा प्रसंग पहा.स्तंभ तो अवचितांचि कडाडी । अब्जजांड अवघेचि तडाडी ॥ अब्जजादि हृदयांत धडाडी । काळ मेघशतनाद घडाडी ॥१०१॥ ध्वनि उठला अखंड । व्यापी द्वीप खंड खंड । होऊ पाहे खंड खंड । ब्रह्मांड हे विदारुनी॥ दिग्गजाचे चंड चंड । भग्न झुंड दण्ड गण्ड । लेंदे टाकिती उदंड । पायु वायु सारुनी ॥ भ्याले दैत्य लंड भंड । दानवेंद्र मुंड मुंड। होती त्यांचे पिंड पिंड । रोमांच उभारुनी ॥ १०३