पान:वामनपंडित.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वामनपंडित. कवीचें नांव नाही, पण तें मध्येच पंचेचाळिसाव्या श्लोकांत आले आहे. ही पद्धति पंडितांची नाही. त्याप्रमाणेच “ मी वेडे वांकडे गातों बोलतों आहे, पण यांत हरीचें नाम आहे, तरी संत हो ! हे गोड मानून घ्या" वगैरे विनवणीचा प्रकार पंडितांच्या म्हणून निश्चित झालेल्या ग्रंथांत आढळत नाही जर हे काव्य वामनाचंच म्हणून समजले गेले, तर त्याचे कर्तृत्व समर्थशिष्याकडे जाईलसें वाटते, अशा रीतीने कविनामहीन त्रुटित किंवा लेखकांनी वामनी शिक्याचे श्लोक घुसडून घोंटाळलेली प्रकरणे बाजूस ठेवून, आतां उर्वरित प्रकरणांचा निकाल कसा लावितां येईल याचा विचार करूं. ११ बाकी राहिलेल्या प्रकरणांचा सूक्ष्म विचार केला तर पंडित व नृसिंहसुत वामन यांशिवाय ' वामन' नावाचे दुसरे निदान तीन कवी होते असे सिद्ध होते. (१) वासिष्ठगोत्री वामन.-काव्यसंग्रहांत पंडितांच्या नांवाने दोन संस्कृत प्रकरणे छापिली आहेत, एक अनुभूतिलेश व दुसरें सिद्धांतविजय. पैकी पहिले प्रकरण तर खुद्द पंडितांचंच आहे, हे मागेंच सिद्ध करण्यांत आले आहे. आतां सिद्धांतविजय या प्रकरणांतील शेवटचा श्लोक असा आहे: अहो, देहो जातो रघुकुलगुरोगोत्रजलधौ।। शुकश्रीव्यासाद्या मुनय इह यत्पूर्वजतमाः॥ स्वनाम्ना यद्वासौ हरिपदरजो वामन इति । . श्रियः कान्तः कर्तापि च स्वकृतसिद्धान्तविजयः ॥ १६ ॥ यांत या वामनकवीचा जन्म सूर्यवंशाचा गुरु जो वसिष्ठ त्याच्या गोत्रांत झाला हे उघडपणे सांगितले आहे. तेव्हां वासिष्टगोत्री वामन गोत्री नृसिंहसुत नव्हे, किंवा यथार्थदीपिकाकार वामनपंडितही नव्हे हैं निर्विवाद ठरते. याच कवीने रामजन्म व सीतास्वयंवर ही प्राकृत काव्ये रचिली आहेत, कारण त्या दोन्हीं काव्यांत पुढील श्लोक आढळतो: श्रीमद्भागवतांत आणि इतर ग्रंथीं, महाभारती । श्रीमद्रामकथा निरूपिलि बरी; व्यासाचिही भारती, ॥