पान:वामनपंडित.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीसरस्वतीमंदिर. गंगालहरी* व भर्तृहरीची शतकें यथार्थदीपिकाकारांची किंवा कोणत्याही वामन कवीची आहेत, असे म्हणण्यास तिळमात्रही आधार नाही. श्लोक म्हटला की वामनी, या पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या विश्वासाचे हे एक ठळक प्रत्यंतर आहे. प्रस्तुत लेखकाच्या एका मित्राने वामनी गंगालहरीची म्हणून एक हस्तलिखित पोथी आणून दिली आहे. ही पोथी अर्धवट असून, हाती आलेल्या पानांत केवळ सतरा श्लोक आहेत. पण यांपैकी एकही श्लोक पंडितांच्या नांवावर प्रसिद्ध झालेल्या गंगालहरीशी जुळत नाहीं ! तेव्हां ही प्रकरणे पंडितांच्या नांवावर मोडली जाण्याचे कारण केवळ पंडितांची श्लोकाविषयी ख्याती होय. चतु:श्लोकी भागवताचीही हीच व्यवस्था. गंगालहरी या काव्यांत गंगेचीच स्तुति करून, तिला सर्व देवांच्या डोक्यावर बसवलेली आहे, तेव्हां गीताभिमानी पंडित या काव्याशी प्राकृतजनांचा परिचय करून देण्यांत फारसें भूषण, शत्तकृत्यता किंवा पुण्य मानतील असें आम्हांस वाटत नाही. अद्वैतज्ञान व भक्ति यांचा फैलाव करण्याची ज्यांना उत्कट इच्छा होती, त्या पंडितांना तो आपला हेतु तडीस जाण्याला भर्तृहरीच्या शतकत्रयाने काही साहाय्य होईल असे मानण्याला आधार आहेसें दिसत नाही. शृंगारशतक तर पंडितांना केवळ अस्पर्यच आहे. तसेच या शतकत्रयांत काही ठिकाणी शंकरभक्ति आढळते, तीही पंडितांच्या मतांशी विसदृशच दिसते. विश्वासबंध हे काव्य पंडितांचे आहे असे मानण्यास हरकत मुळीच नाही. परंतु 'विश्वास-बंध' करवी बरवा मनाचा । ऐसा समर्थ अभयंकर वामनाचा ॥. या पंधराव्या श्लोकांतच हे प्रकरण समाप्त झालेले आहे व पुढील सात श्लोक या प्रकरणाला उगीच जोडलेले आहेत. प्रेमसरी हे प्रकरण सरस आहे. परंतु पंडितांचे नाही, असे वाटते. त्याच्या आदी व अंती

  • बाळाजी आणि कंपनीच्या वामनी ग्रंथांत गंगालहरी व ब्रह्मोपदेश ही प्रकरणे छापिली आहेत. परंतु · वामनाच्या नांवावर मोडणारी प्रकरणे' या मथळ्याखाली त्यांचा संग्रह करण्यांत आला आहे. या प्रकरणांपैकी ब्रह्मोपदेश हा वामनशिष्य साम्राज्यवामन याचा आहे.