पान:वामनपंडित.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वामनपंडित. ५५ कृष्ण आणि रुक्मिणी यांच्या संवादास 'प्रेमसंवाद' हे नांव यथार्थ आहे, हे प्रत्येक रसिक किंवा नुसता व्यवहारज्ञानीही कबूल करील. पण शुकरंभासंवादाला हे नांव का आणि कसे द्यायचे हे मात्र प्रत्येकाला न उलगडणारेंच कोडे पडणार ! तसेच शुकरंभासंवादाशी 'गुणलव कथिले हो वामनें केशवाचे।' या चरणाचा बादरायण संबंधही लावण्याचे धाडस कोणी समंजस करील असे वाटत नाही. श्लोक म्हटला की वामनाचाच व मग एकाद्या प्रकरणांत कविनाम नसेल किंवा तें प्रकरण अपुरे असेल, तर वामनाचें नांव ज्यांत आहे, असा वाटेल तो उपसंहारात्मक श्लोक घुसडण्यांत कसूर करावयाची नाही, ही जी घातक चाल जुन्या लेखकांची व हरिदासांची होती, तिचेच हे गुण पाघळले आहेत! ही स्थिति आणखी किती प्रकरणांत झाली असेल ते खात्रीने अजमावतां येत नाही. परंतु कित्येक ठिकाणी हा प्रकार बिनचूक उघडकीस येतो, त्यांपैकींच प्रकृत स्थळ हे एक आहे. नौकाक्रीडा हे प्रकरण याच मासल्याचे आहे. प्रकरण अर्धवट पण वामनी शिक्क्याचा उपसंहार हा आहेच. या प्रकरणाची काही अधिक पये परिशिष्टांत दिलेली काव्यसंग्रहांतील पुस्तकांत आढळतात. त्यांतील शेवटले पद्य असे आहे: ऐकोनी जननी हरीस हृदयीं घेऊनि दे चुंबना। बा रे! तूं बहु कष्टलास म्हणुनी घालीतसे भोजना.॥ शय्या घालनि मंचकी निजविलें त्या वासुदेवाप्रति । सद्भावें करि विश्वनाथ हृदयीं अत्यंत त्याची प्रिती.॥१८॥ यावरून हे काव्य विश्वनाथ कवीचे आहे, हे निर्विवाद ठरले. परंतु जोपयत हा श्लोक उपलब्ध नव्हता, तोपर्यंत ते वामनाच्या नावाखाली दडपण्याला वामनी ठशाचा उपसंहारात्मक श्लोक होता! भगवत्स्तुति हे षट्श्लोकात्मक प्रकरण याच नमुन्याचे. काव्यसंग्रहांत तिसऱ्या भागांत स्फुटश्लोक दिले आहेत, त्यांतील बरेचसे वामनाचे नसावेत. त्याच भागांतील सवायांपैकी काही सवाया उद्धवचिद्धनाच्या ग्रंथांत छापिल्या आहेत, असे नुकतेच एका इसमाने केसरीपत्रांत प्रसिद्ध केले होते,