पान:वामनपंडित.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीसरखतीमंदिर. परंतु यांतील नृसिंहाचा व वामनकवीचा संबंध काय होता है स्पष्ट होत नाही तरी पण त्यांचे पितापुत्रांचेच नातें ठरतें असा कोणाचा आग्रह असेल, तर या शांडिल्यगोत्री नृसिंहसुत वामनाची (१) भीष्मयुद्ध (२) उपदेशमाला १ ली व (३) उपदेश माला २ री इतकीच प्रकरणे निश्चित होतात. १० इतर प्रकरणांचा विचार करायचा म्हणजे प्रथम जी प्रकरणे त्रुटित आहेत किंवा कविनामहीन आहेत ती वेगळी काढणे जरूर आहे. अशा त-हेची प्रकरणे सुमारे पंधरा आहेत. स्थालीपाक, पार्थभाग्य, कंसवध २ रा, गोरसविक्रय, रसनास्तुति, नाममहिमा, भक्तिमाहात्म्य, भगवद्दास्य या प्रकरणांपैकी काही त्रुटित व सर्व कविनामहीन आहेत. भीष्मशरपंजर हे प्रकरण चिंतनीय आहे. यांत शेवटचा श्लोक असा आहे: काशीस नाम जननी, जनकाभिधानी । श्रीविश्वनाथ, मम दैवत कृष्णवेणी॥ श्रीमन्महेश अवमर्षण जो उपायीं। दासानुदासचि तरे दव तो सुपायीं ॥ २९॥ यांतील प्रथमाधांत कवीने आपल्या आईबापांची नांवें काशी व विश्वनाथ दिली असून, त्याचे कुळदैवत कृष्णवेणी असल्याचे स्पष्ट आहे. उत्तराध/तील श्रीमन्महेश हे कवीचें नांव आहे की काय ते समजत नाही पण हैं काव्य नृसिंहसुत वामनाचे किंवा यथार्थदीपिकाकार पडितांचेही नाही हे स्पष्ट आहे. शुकरंभासंवाद हे प्रकरण अर्धवटच आहे अर्थात् शेवटचा भाग उपलब्ध नसल्यामुळे, खरे म्हटले तर या काव्याचा उपसंहारात्मक श्लोक सांपडणेच असंभवनीय आहे, तरीपण त्या प्रकरणाचा उपसंहारात्मक श्लोक छापून प्रसिद्ध आहे आणि विशेष चमत्कार हा की, यांतील उपसंहार व रुक्मिणीविलासांतील उपसंहार एकच आहे, ते असा: धरतिल हृदयीं हा 'प्रेमसंवाद' साधू । म्हणउनि अभिधानीं ग्रंथ हा हेंचि साधू ॥ गुणलव काथले हो वामनें केशवाचे । धरुनि चरण चित्तीं श्रीहृषीकेश वाचे ।।