पान:वामनपंडित.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. वामनपंडितांचे ग्रंथ वाचीत असतांना काही प्रकरणांतील दुर्बळ भाषासरणी, पोरकट कल्पना, फाजील अश्लीलपणा, यथार्थदीपिकेशी विसंगत अशी विचारसरणी इत्यादि प्रकार पाहून मनांत ज्या शंका उद्भवल्या व जी अनुमाने काढतां आलीं, तीच प्रस्तुत निबंधांत नमूद केली आहेत. यांतील सर्वच गोष्टी सर्वांस पटतील असें नाही. तेव्हां या विषयाची चर्चा होऊन, प्रस्तुत लेखकाच्या अनुमानांचे व सिद्धान्तांचे कोणी सकारण खंडन केले असतां, लेखक त्याचा आभारी होऊन आपली चूक सुधारील. केवळ सत्यान्वेषणाचाच हा प्रयत्न आहे. मुरूड-जंजिरा. १/७०५. बा० अ० भिडे.