पान:वामनपंडित.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वामनपंडित. आहे. यांत संदिग्धता मुळीच नाही. आता प्रश्न इतकाच की, हा वामन व स्थार्थदीपिकाकार वादन हे एकच मानावयाचे की कार्य। भीष्मप्रतिज्ञा हे काव्य अगदीच किरकोळ व फालतू आहे. त्यांतील श्लोकसंख्याही केवळ एकवीसच आहे; म्हणजे जर हे काव्य यथार्थदीपिकाकारांचे असे समजले, तर त्यांच्या वर निश्चित झालेल्या महाग्रंथांपुढे हे प्रकरण खंडीत राई किंवा दांत बिंदू याप्रमाणेसुद्धा साजणार नाही. तेव्हां यथार्थदीपिका, निगमसार, कर्मतत्त्व, हरिविलास, नामसुधा, ब्रह्मस्तुति वगैरे प्रचण्ड, बुद्धिवैभवदर्शक, भक्तिपरिपूर्ण, अत्यंत उपयुक्त व हृदयंगम ग्रंथांत जी गोष्ट पंडितांनी सर्व जगापासून गुप्त ठेविली, जिचा रेसभरही थांगपत्ता लागू दिला नाही, त्याच गोष्टीचा परिस्फोट करण्यासाठी या क्षुल्लक एकवीसश्लोकी प्रकरणांत हपापून, एकदाच नव्हे, तर दोनदा स्पष्ट उल्लेख करतील हे मानवी स्वभावाला व युक्तीला साजेसे आहे काय? प्रस्तुत प्रकरणांत राधाकृष्ण किंवा कृष्णरुक्मिणी अशा त-हेचें ईश्वरस्वरूप वर्णिले असते, तर ते काव्यप्रसंगास तरी शोभलें असते, कारण प्रसंग कृष्णावतारीचा आहे. परंतु लक्ष्मीनृसिंहाचा प्रकृत विषयाशी काय संबंध होता? अर्थात् काही नाही. तेव्हां विषयाशी असदृश असें मंगलाचरण करण्यांत कवीचा हेतु इतकाच दिसतो की, आपल्या मातापितरांची किंवा कुळदेवतांची नांवें प्रसिद्ध होऊन, त्यांविषयी आपली उत्कट भक्तीही जगजाहीर व्हावी. तेव्हां अशा त-हेची अनावर उत्कंठा यथार्थदीपिकाकारांस खचित साजत नाही. म्हणून भीष्मप्रतिज्ञेचा कर्ता वामन हा यथार्थदीपिकेचा कर्ता नव्हे, असें साफ म्हणण्यास आम्हांस तर काही हरकत दिसत नाही. वामनी ग्रंथांत मोडणाऱ्या दुसऱ्या कोणत्याही काव्यांत ही माहिती आलेली नाही. नाही म्हणायाला 'उपदेशमाला' (प्रकरण १ लें) हे जे ६४ अभंगांचें प्रकरण काव्यसंग्रहांत पंडितांच्या स्फुट प्रकरणांच्या तिसऱ्या भागांत छापिलें आहे, त्यांत नृसिंह हे नांव आले आहे उपदेशमाला सुता देवराया । नृसिंहें बिंबाया करवीली.॥ ६२ ॥ तेचि सर्व शिष्यां उपयोगा आली । कंधरी घातली ज्याने त्यानें ॥६३॥ वामने अर्पिली श्रीगुरुचरणीं । सकळ करणी तयाचीच. ॥६४ ॥