पान:वामनपंडित.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५२ श्रीसरस्वतीमंदिर. रांशी काहीच संबंध नव्हता. अर्थात् कालांतराने रामदासस्वामींचा शिष्य जो वामन त्याची कीर्ति यथार्थदीपिकाकारांच्या प्रचंड ग्रंथकर्तृत्वापुढे व लौकिकापुढे लोपून गेल्यामुळे, तो लोकांच्या स्मृतींतूनच नष्ट झाला व मग वामनकवि या नांवाला यथार्थदीपिकाकार वामनपंडित यांशिवाय कोणी हक्कदारच राहिला नाही. तेव्हां समर्थशिष्याचे ग्रंथ व आख्यायिका यांची साहजिक रीतीने यथार्थदीपिकाकारांच्या ग्रंथांशी व आख्यायिकांशी भेसळ होऊन त्यांचा पूर्ण मिलाफ बनला, व हा सर्व चिवडा यथाथदीपिकाकारांच्या नांवावर लादण्यांत आला. ही उपपत्ति जर गृहीत धरली, तर हनुमंतस्वामींच्या हकीकतींतील प्रत्येक मुद्यांतील काही भाग पंडितांनी दिलेल्या स्वतःच्या वृत्ताशी कां जुळतात व जेथे जेथें समर्थांचा संबंध आला आहे तेथे तेथें अद्भुतता व विसंगतता ही कां दिसून येतात, यांचे मर्म उघड होईल, असे आम्हांस वाटते. या समर्थशिष्याचे म्हणून कोणते ग्रंथ वेगळे निवडतां येतात, याचा पुढे योग्य स्थळी खुलासा होईल. ____९ कै० हंस, बाळाजी आणि कंपनीतील चरित्रकार, वा. दा. ओक वगैरे दरोबस्त चरित्रकारांनी पंडितांचे कुलवृत्त जे दिले आहे, त्यास आधार काय तो एका प्रकरणाचा आहे. हे प्रकरण म्हणजे 'भीष्मप्रतिज्ञा' ऊर्फ 'भीष्मयुद्ध' होय. हे अवघे २१ श्लोकांचे आहे. त्यांतील पहिला व एकविसावा हे श्लोक येणेप्रमाणे आहेत: लक्ष्मीनृसिंहचरणद्वयसारसाचा । जो हेतु मान्य वदती बहुसार साचा । प्रत्यूहमत्तगजसिंह तया नमीतों। जाणे तयाहुनि कदापि न आन मी तों ॥१॥ ताताभिधा नृहरि पंडित, माय लक्ष्मी । जे सर्वदा सुगुणयुक्त उदार लक्ष्मी । टिळा मोन, उज्जन सिंह माना। दासानुदास निज वामन हो मनाचा ॥२१॥ येथे कवीने प्रथम श्लोकांत पर्यायाने व अंत्य श्लोकांत सरळ रीतीने आपल्या मातापितरांची लक्ष्मी व नृसिंह अशी नावे दिली आहेत. तसेच गोत्र शांडिल्य, कुळदेव नृसिंह व स्वतःचे नांव वामन हेही सांगितले