पान:वामनपंडित.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वामनपंडित. संभवत नाही. हनुमंतस्वामींनी वर्णिलेला अद्भुत प्रकार; समर्थानी धरलेलें रुद्रखरूप; केलेला भुःभुःकार ; वामनाला दिलेले शेपटाचे तडाखे; चौदा ब्रह्मांसंबंधे वाद चालला असता, 'समस्या पूर्ण झाली का?' म्हणून केलेला प्रश्न वगैरे सर्व गोष्टी अप्रयोजक, अघटित व समर्थांच्या कीर्तीशी विसंगत दिसतात. गिराबाई हंसली त्या संबंधीही गोष्ट विलक्षण भासते. कारण गिराबाईच्या उत्तरांत पंडितांना उपरति होण्यासारखें अपूर्वज्ञान भरलेले होते असे मुळीच दिसत नाही. वाचकांनी पुढील उतारा गिराबाईच्या गोष्टीशी ताडावाः श्रीसचिदानंद गुरू । ब्रह्मविद्येचा कल्पतरू । करुणामृताचा सागरू । वेदांतवेद्य गोविंद ॥९॥ जो भेटला मलयाचळीं । मार्गी पाक करते काळीं। आधीं स्फुरला हृदयकमळीं । सच्चित्पदार्थ विचारिता. ॥१०॥ उपनिषदार्थ पाहतां । आत्मा ब्रह्म हे तत्त्वतां । । परि अनुभवा नये ऐशी चिंता । ज्या दिवसांत अत्यंत ॥ ११ ॥ तथापि सत्पदें पाहतां । आपणासि घडे ब्रह्मता ॥ परि आनंद कैसा न कळे तत्त्वतां । मनीं ऐसा विचार ॥१६॥ ऐसे विचारितां मनीं । तो ऐकों आली हास्यध्वनि । पाहतों जों परतोनी । वस्त्र भगवे देखिलें. ॥१७॥ कृपादृष्टी अवलोकुनी । 'काय विचारितां हो मनी? । म्हणोनि पुसतां धावोनी । श्रीचरणा लागलो. ॥ १९ ॥ -निगमसार, अध्याय १. अशा प्रकारे सच्चिदानंदसाक्षात्कार झाल्याचा जो प्रकार निगमसारांत वर्णिला आहे, त्यांत यतीच्या ठिकाणी गिराबाईची योजना होऊन वरील दंतकथा उपस्थित झाली व हनुमंतस्वामींनी आपल्या रामदासस्वामींच्या चरित्रांत ती तशीच घुसडली! या एकंदर घोटाळ्याचा उलगडा असा करितां येतो की, तुकाराम व रामदास यांची स्तति गाणारा. यमकांचा अभिमान बाळगणारा, ‘यमक्या वामन' या नावाने प्रसिद्धीस आलेला, पांडित्याचा वृथागर्व समर्थांनी परिहार केल्यामुळे त्यांचा शिष्य मनलेला, संतमंडळीच्या पुठ्यांत शिरलेला व दत्तात्रयादिकांची स्तोत्रे पारा वामन ही अगदी स्वतंत्र व्यक्ति होती व त्याचा यथार्थदीपिकाका