पान:वामनपंडित.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीसरस्वतीमंदिर. प्राकृतग्रंथकारो ये तु वर्षशतात्पुरा। त्यक्तदेहास्तैर्यथोक्तं न तथा ज्ञानिनोधुना ॥ १४२ ततो ज्ञाने निराशोहं जातो नास्तीति भूतले । विनिश्रितस्तनुत्यागः सितासितसमागमे ॥ १४३ यावरून पंडित तुकाराम, रामदास इत्यादि साधुसंतांकडे गुरूपदेशासाठी गेले होते, हेही उघड आहे. परंतु यापलीकडे हनुमंतस्वामींच्या कथेत कांहींच तथ्य दिसत नाही. उलट पंडित साफ म्हणतात की, 'मला या पृथ्वीवर खरें खरें अद्वैतज्ञान करून देणारा गुरु कोणीच भेटला नाही. शेवटी मी ज्ञानाविषयी निराश झालों व गंगायमुनासंगमांत देहत्याग करण्याचा निश्चय केला.' यावरूनही हनुमंतस्वामींच्या हकीकतीतील आणखी एक सत्यकण हाती लागतो की, पंडित एकदा निराशेने जीव देण्यास तयार झाले होते खरे. परंतु नुसतेच भगवद्दर्शन झाले पण उपदेश झाला नाही, अवधूतसेवा घडली पण त्यांनी “ उपदेश समर्थांचा घ्या" म्हणुन पंडितांना सांगितले, वगैरे गोष्टींचा थांगपत्ताही लागू शकत नाही. आणि “ये प्राहुः शिवनिर्विशेषमनिशं ब्रह्मोति वेदान्तिनः कर्तारं कुशलाः प्रमाणपटवः सशुक्तिभिस्तार्किकाः। अन्ये स्वाभिमतं वदन्ति बहुधा सांख्याः प्रधानं परं तस्मै सद्गुरवेति (?) संतु नतयः श्रीरामदासाय मे ॥१" यासारखी अघळपघळ स्तुति पंडितांच्या लेखणीतून उतरणे म्हणजे सूर्यबिंबांतून अंधाराचा लोट बाहेर पडण्यासारखंच आहे! चौदा ब्रह्मांविषयींच्या वादासंबंधीची हकीकत महिपतीने संतविजयाच्या एकविसाव्या अध्यायांत दिली आहे, परंतु तो वाद कोणी एक ब्राह्मण व समर्थ यांमध्ये झाल्याचे बोवा लिहितात. तेव्हां हा विरोध हनुमंतस्वामी-1 च्या कथेवर मारक आहे. शिवाय बाळाजी आणि कंपनीतील चरित्रकार म्हणतात त्याप्रमाणे “ पदार्थास संज्ञार्थ ब्रह्म असें नांव दिलेले, परंतु तो पदार्थ खरें ब्रह्म नव्हे; असे हे चौदा पदार्थ ब्रह्म या नांवाने माडतात, परंतु ते ब्रह्म नव्हत ही क्षुल्लक गोष्ट या महापंडितांस समजली नाही व ती ब्रह्मेच आहेत, असा ते दुराग्रह धरून बसले" ही गोष्ट • वामनपंडितांचे चरित्र ( बाळाजी आणि कंपनी ) पृष्ठ ११.